आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरणा पात्रात वाळुमाफियांची चांदसर ग्रामस्थांना मारहाण; महसूल, पाेलिसांनी मिटले डाेळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव शहरात पाेलिस अाणि महसूल प्रशासनाला जेरीस अाणणाऱ्या वाळूमाफियांनी गिरणा नदीपात्राच्या शेजारील गावांत दहशत माजवली अाहे. गिरणाकाठी असलेल्या धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे दिवस-रात्र सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे ग्रामस्थ हैराण झाले अाहेत. अवैध वाळू उपशाविराेधात अावाज उठवणाऱ्या ग्रामस्थांना थेट वाळूमाफियांकडून मारहाण केली जाते. एवढेच नव्हे तर पाेलिसात फिर्याद देखील घेतली जात नसल्याने गावकरी हतबल झाले अाहेत. 


चांदसर येथील गिरणा नदीतील वाळूचा ठेका दिलेला नाही. नदीपात्रात माेठी वाळू उपलब्ध असल्याने लाडली व अासपासच्या १५ ते २० वाळूमाफियांकडून बेसुमार वाळू उपसा हाेत अाहे. गावातील काही लाेकांना हाताशी धरून वाळू तस्कर थेट गावातून वाळू वाहतूक करतात. प्रशासनाने कारवाई केल्यास त्याचा राेष ग्रामस्थांवर काढला जाताे. दाेन दिवसांपूर्वीच वाळूमाफियांनी रात्री अंधारात साहिल पठाण या २२ वर्षीय युवकावर हल्ला केल्याने प्रकरण पाेलिसात गेले अाहे. महसूल विभागाने वाळू वाहतूकदारांची वाहने जप्त केली असली तरी पर्यायी वाहनांमधून वाळूचा उपसा सुरू अाहे. 


प्रशासनाकडून हप्तेखाेरी 
बांभाेरी ते चांदसरपर्यंतच्या गिरणा नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी डंपरला मासिक ५० हजार तर ट्रॅक्टरला ३० हजार रुपये प्रशासनाला द्यावे लागतात, अशी अाेरड अाहे. मासिक पैसे दिल्यानंतर प्रशासनाकडे वाहन क्रमांक दिल्यानंतर त्या वाहनावर कारवाई हाेत नाही. महिन्यातून एक वेळ किरकाेळ दंडात्मक कारवाई करण्याचा अलिखित करारच करण्यात अाला अाहे. दरम्यान, नव्या वाळू धाेरणानुसार दंडाची रक्कम ही एक लाखांपेक्षा अधिक करण्यात अाल्याने अवैध वाळू वाहतूक करणारे अाणि प्रशासनात खटके उडत असल्याचे एका वाळू वाहतूकदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. वाळू वाहतूकदार अाणि प्रशासनातील वादाचे परिणाम मात्र गावकऱ्यांना भाेगावे लागत अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...