आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पद्मावत' सिनेमास विराेध असेल तर अाताच सांगा, प्रदर्शित करणार नाही; सिनेमागृह व्यवस्थापकाचे अावाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सातत्याने चित्रपटांना वेगवेगळ्या कारणांनी होणाऱ्या विरोधामुळे चित्रपटगृहांचा व्यवसाय अडचणीचा झाला आहे. गेल्या चार-पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर चित्रपट बंद पाडण्याचे प्रकार हाेत असल्याने अाम्ही व्यवसाय कसा करावा? हा अवघड प्रश्न अाहे. असेच चालले तर येत्या १ एप्रिलपासून राजकमल सिनेमागृह बंद करण्यात येईल. तसेच २६ राेजी पद्मावत चित्रपट प्रदर्शित हाेणार अाहे. या चित्रपटाला कुणाचा विरोध असेल तर अाता सांगा. म्हणजे मी चित्रपटाचे प्रदर्शन करणार नाही, असे अावाहन सिनेमागृहाचे व्यवस्थापक महेंद्र लुंकड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

 

पद्मावत चित्रपट प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात अाली. त्याला काही संघटनांचा विरोध आहे. राजकमल सिनेमागृहाला १४ नोव्हेंबर २०१७ रोजी राजपूत संघटनांतर्फे चित्रपट लावू नये, असे निवेदन देण्यात आले होते. त्या वेळी चित्रपट प्रदर्शित झालेला नव्हता किंवा परवानगी मिळालेली नव्हती. अाता सेन्सॉर बाेर्डाने या चित्रपटाला मंजुरी दिली अाहे. जळगावात यापूर्वीही देऊळ, दशक्रिया, मैं हू खान, पिके, टायगर जिंदा है आदी चित्रपटांना विविध संघटना समाजातर्फे विरोध करण्यात आला होता. असेच हाेत राहिले तर चित्रपटगृह चालतील कसे? असा प्रश्न लुंकड यांनी उपस्थित केला अाहे. या चित्रपटाच्या बुकिंगसाठी चालकांना वितरकाकडे ५ ते ६ लाख रुपयांचे बुकिंग करावे लागते. मात्र, चित्रपट बंद पाडला तर ही रक्कम परत मिळत नाही. त्यामुळे २६ राेजी प्रदर्शित हाेणाऱ्या पद्मावत चित्रपटाला काेणत्या संघटनांचा विरोध असेल तर याबाबत कळवावे. म्हणजे या चित्रपटाचे प्रदर्शन करणार नाही, असेही लुंकड यांनी स्पष्ट केले अाहे.

बातम्या आणखी आहेत...