आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार न साेडणाऱ्या लिपिकाची चौकशी; बेरोजगारांच्या नोंदणीसाठी पैसे घेतल्याची तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बांधकाम विभागातील बदली होवूनही पदभार सोडण्यास तयार नसलेल्या लिपिक सी. एस. पाटील यांना कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांच्याबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यात येणार आहेत. सुशिक्षीत बेरोजगारांकडून रजिस्ट्रेशनचे पैसे घेतल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली आहे. 


जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात बिले काढणे, कामांची शिफारस करणे आणि सुशिक्षीत बेरोजगार अभियांत्याची नोंदणी करण्याचे काम लिपिक सी. एस. पाटील यांच्याकडे देण्यात आले होते. यात सुशिक्षीत बेरोजगारांकडून लिपिक सी. एस. पाटील यांच्याकडून पैशांची मागणी केली जात होती. मला वरिष्ठ अधिकाऱ्यांना यांना पैसे द्यावे लागत असल्याचे सी. एस. पाटील हे सांगत असल्याची लेखी तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आली आहे. यासंदर्भात सी. एस. पाटील यांची चौकशी करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी सांगितले. 


दरवर्षी ५०० रजिस्ट्रेशन 
बांधकाम विभागात दरवर्षी ५०० ते ६०० अभियंत्यांची सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नोंदणी करून त्यांना कामांचा परवाना दिला जातो. या नोंदणीसाठी प्रत्येक जणांकडून १० ते १२ हजार रूपये घेतले जात असल्याची तक्रार आहे. सी. एस. पाटील हे २०१३पासून या विभागात असून त्यांच्या कार्यकाळात किती लोकांची नोंदणी झाली? याची चौकशी करणार असल्याचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. के. पवार यांनी सांगितले. 


खुर्च्या न सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नजरा 
सी. एस. पाटील हे बदली होवूनही चार महिन्यांपासून पदभार सोडत नव्हते. जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारतीमधील अनेक विभागात कर्मचारी बदली होवूनही पदभार सोडत नसल्याची स्थिती आहे. या कर्मचाऱ्यांवर कुणाची मेहेर नजर आहे? याबाबत जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांमध्ये कुजबुज सुरू झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...