आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे हत्याकांड: मुख्‍यमंत्र्यांची पीडित कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत, कठोर कारवाईचे आश्‍वासन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनेनंतर राईनपाडा येथे सामाजिक कार्यकर्ते धाव घेत असून पिडित कुटुंबियांना धीर देत आहेत. - Divya Marathi
घटनेनंतर राईनपाडा येथे सामाजिक कार्यकर्ते धाव घेत असून पिडित कुटुंबियांना धीर देत आहेत.

पिंपळनेर (जि. धुळे)- राईनपाडा येथे मुले पळवणारी टोळी असल्‍याच्‍या संशयावरून 5 भिक्षुकांची निर्घृण हत्‍या केल्‍याची घटना दुर्दैवी असल्‍याचे मुख्‍यमंत्र्यांनी म्‍हटले आहे. तसेच पिडित कुटुंबियांना राज्‍य शासनातर्फे 5 लाख रुपयांची मदतही मुख्‍यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू करण्‍यात आली असून काही आरोपींना अटक करण्‍यात आली आहे, असे मुख्‍यमंत्र्यांनी म्‍हटले आहे. 

 

कुटुंबियांनी मृतदेह स्‍वीकारले 
रविवारी साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावानजीक राईनपाडा येथे सकाळी 11 वाजेच्‍या सुमारास बेभान जमावाने पाच भिक्षुकांना ठेचून मारले होते. मृत पाचही जण प्राणाची भीक मागत असताना क्रौर्य इतके पेटले होते की, ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन या भिक्षुकांना लाथा-बुक्क्यांनी अक्षरश: तुडवण्यात आले. त्यानंतर काहींनी चपला, दगडविटांनी ठेचले. यातच पाचही जणांनी प्राण सोडले. थरकाप उडवणाऱ्या या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी आले होता. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवला होता. 

 

मृत पाचही जण अापल्या 15 सदस्यीय कुटुंबीयांसह पिंपळनेर गावाजवळ राहत हाेते. अंगाचा थरकाप उडवणा-या या घटनेनंतर कुटुंबियांनी जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्‍वीकारणार नाही, असा पवित्रा घेतला होता. यावर आज धुळे जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी रेखावार यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्‍यात येईल, असे लेखी आश्‍वासन कुटुंबियांना दिले. यानंतर पिडित कुटुंबियांनी पाचही मृतदेह ताब्‍यात घेतले. 

 

जिल्‍हाप्रशासनाने मान्‍य केल्‍या पीडितांच्‍या​ या 4 प्रमुख मागण्‍या 
1)
घटनेत दोषी असलेल्‍या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्‍यात येईल. नातेवाईकांच्‍या मागणीनूसार गुन्‍ह्याचा तपास एस.आय.टी कडे देणेबाबत उचित निर्णय घेण्‍यात येईल. तसेच त्‍यांच्‍या मागणीनूसार अॅड. उज्‍ज्‍वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्‍हणून नेमणूक करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव शासनाकडे पाठवण्‍यात येईल. 
2) मृत व्‍यक्‍तींना सानुग्रह मदत देणेबाबतचा प्रस्‍तावर तातडीने तयार करण्‍यात येऊन शासनाकडे सादर केला जाईल. याबाबत व्‍यक्‍तीश: पाठपुरावा केला जाईल. 
3) मृत व्‍यक्‍तीच्‍या वारसांना नोकरी देण्‍याबाबतचा प्रस्‍ताव शासनाकडे पाठविण्‍यात येईल. 
4) याप्रकारे भिक्षुकी व्‍यवसाय करणा-या लोकांमधील असुरक्षिततेची भावना काढून टाकण्‍यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्‍यक ते खबरदारीचे उपाय योजिले जातील. तसेच भिक्षेकरी संरक्षण कायदा बनविण्‍याची आपली मागणी शासनास कळवली जाईल. 


गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आज राईनपाडा गावाला भेट देणार
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे आज राईनपाडा गावाला भेट देणार असल्‍याची माहिती आहे. यादरम्‍यान ते गावकरी व पिडित कुटुंबियांना भेट देतील, अशी माहिती आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाह, फोटो...

 

हेही वाचा, 
येताच DGP अॅक्‍शनमध्‍ये, धुळ्यातील घटनेवरून दिले हे कठोर आदेश

 

बातम्या आणखी आहेत...