आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकींची समाेरासमाेर धडक; ड्यूटी करून परतणारा कॉलेज तरुण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातात मृत झालेला लैलेश. रस्‍त्‍याच्‍या कडेला नागरिकांनी उचलून ठेवलेल्‍या दुचाकी. - Divya Marathi
अपघातात मृत झालेला लैलेश. रस्‍त्‍याच्‍या कडेला नागरिकांनी उचलून ठेवलेल्‍या दुचाकी.

जळगाव - रात्रीपाळीची ड्यूटी संपल्यानंतर घरी जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीची व जळगाव स्टेशनवरून नातेवाइकास कुसुंबा येथे ट्रिपल सीट घेऊन जाणाऱ्या एका तरुणाच्या दुचाकीची समाेरासमाेर जाेरदार धडक झाली. या भीषण अपघातात ड्यूटीवरून घरी जाणारा तरुण जागीच ठार झाला. तर कुसुंबा येथे जाणारे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यातील दाेघांची प्रकृती गंभीर अाहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील रॉयल फर्निचर समोर घडली. लैलेश चौधरी असे मृत तरुणाचे नाव असून ताे 'मूजे'चा एनसीसी कॅडेट हाेता.

 

बातम्या आणखी आहेत...