आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढणार : दिलीप वळसे-पाटील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीतील अाघाडीचा कटू अनुभव विसरून काँग्रेस अाणि राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकत्रित येण्याचा निर्णय घेतला अाहे. यापुढच्या सर्व निवडणुका एकत्रित लढण्यावर निर्णय झाला. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर स्वतंत्र बैठक घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकारांशी बाेलताना दिली. 


काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत शिक्षक मतदारसंघातील उमेदवार संदीप बेडसे यांच्या प्रचारासाठी बुधवारी राष्ट्रवादी कार्यालयात एकत्रित मेळावा झाला. या वेळी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विनायक देशमुख, माजी मंत्री गुलाबराव देवकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. उल्हास पाटील, माजी अामदार शिरीष चाैधरी, शहराच्या प्रभारी डाॅ. हेमलता पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, डी. जी. पाटील, अॅड. ललिता पाटील, उमेदवार संदीप बेडसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अागामी निवडणुकीसंदर्भात दाेन्ही पक्षांच्या नेत्यांनी अापली बाजू मांडली. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित येऊन अाघाडी केली हाेती. यात दाेन्ही पक्षांची निवडीनंतर एेनवेळी अाघाडी तुटली अाणि काँग्रेस भाजपसाेबत सत्तेत गेली. त्यामुळे दाेन्ही पक्षांमध्ये अाराेप-प्रत्याराेपाच्या फैरी झडून मतभेद निर्माण झाले हाेते. दरम्यान, अागामी महापालिका निवडणुकीत हे दाेन्ही पक्ष पुन्हा एकत्रित येणार अाहेत. वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानुसार अाम्ही एकत्रित येत असून यापूर्वी झालेल्या चुका सुधारणार असल्याचे काँग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख यांनी सांगितले. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अाटाेपल्यानंतर दाेन्ही पक्षांची एकत्रित बैठक घेऊन महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात अाले. या बैठकीत जागा वाटप अाणि इतर राजकीय स्थितीवर देखील चर्चा हाेईल. 


२०१९ची लढाई एकत्रित... 
२०१९मध्ये हाेणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस अाणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार अाहेत. लाेकसभा अाणि विधानसभा निवडणुकीत दाेन्ही पक्ष महाराष्ट्रात अाघाडी करून लढतील याबाबत निर्णय झाला अाहे. ही लढाई एकत्रित लढविण्यात येणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील, विनायक देशमुख यांनी सांगितले. 


जिल्हाध्यक्ष निवड लवकरच...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर लवकरच निर्णय घेतला जाणार अाहे. यासंदर्भात मुंबईत २० जून राेजी अायाेजित केेलेली बैठक पुढे ढकलण्यात अाली अाहे. ही बैठक झाल्यानंतर निर्णय घेऊ. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते एकसंघ असून केवळ कामात कमी पडत अाहेत. त्यांना एकत्रित घेऊन पुन्हा कामाला लागणार असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...