आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी पेपरला काॅपी पुरवणारा ताब्यात, जळगाव जिल्ह्यातील ६ काॅपीबहाद्दर डिबार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला गुरूवारी शहरातील विद्यानिकेतन शाळेमागील बाजूने चढून काॅपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला पकडून शहर पाेलिसांच्या ताब्यात देण्यात अाले. तर डाएटच्या प्राचार्यांच्या भरारी पथकाने भुसावळ अाणि यावल तालुक्यातील परीक्षा केंद्रावर ६ काॅपीबहाद्दर विद्यार्थी डिबार केले अाहेत.

 

डाॅएटचे प्राचार्य डाॅ. गजानन पाटील यांच्या भरारी पथकाने किनगाव येथील नेहरू माध्यमिक विद्यालयात १ विद्यार्थ्यावर तरा डाॅ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल (यावल) येथे ३ जणांवर कारवाई करण्यात अाली. बाेर्डाच्या पथकातील शुभांग राठी यांच्या पथकाने भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथे २ जणांवर कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...