आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी योजनेत भ्रष्टाचार; तळोद्यात गुन्हा दाखल; सन २००६-०८ कालावधीत ९ कोटींची अफरातफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा/नंदुरबार- राज्यात अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या आदिवासी योजनांच्या घोटाळाप्रकरणी अखेर तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी गुलाबसिंग वळवी यांच्याविरुद्ध तळोद्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकल्पात सन २००६ ते २००८ या कालावधीत ९ कोटी ७ लाखांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, यात ज्या संस्था सहभागी झाल्या त्या संस्था चालकांवरही गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यातील इतर आदिवासी प्रकल्पांमध्ये गुन्हे दाखल केले जाणार आहेत. 


तत्कालीन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कार्यकाळात म्हणजेच सन २००६ ते २००८ दरम्यान आदिवासींच्या विकासासाठी राज्यातील आदिवासी बहुल भागात दुधाळ गायी, म्हशींचे वाटप करतण्यात आले होते. तसेच, आदिवासींच्या विकासासाठी अन्य योजनाही राबवल्या होत्या. परंतु, लाभार्थींपर्यंत या योजना पोहोचल्याच नाहीत. या प्रकरणी साक्री तालुक्यातील मोतीराम पोपट बहिरम व गुलाबराव पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.


नंदुरबार-धुळ्यातील संस्थांवर गुन्हा 
या घोटाळ्यात दूध उत्पादक कृषी सहकारी संस्था तळोदा, मंजुळाबाई दूध उत्पादक संस्था तळोदा, गोपाल दूध उत्पादक संस्था तळोदा, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ धुळे, राज्य सहकारी फेडरेशन संस्था, आकाशदीप संस्था यासह अन्य संस्थांच्या नावे हा घोटाळा झाला. 

बातम्या आणखी आहेत...