आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल-फैजपूर रस्त्यावर ओमीनी-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी, एक गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - तालुक्यातील हंबर्डी येथे दुचाकी व ओमीनीच्‍या अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्य जबर जखमी झाले आहे. गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्‍ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. फैजपूर येथे खासगी रुग्‍णालयात प्रथमोपचार करून जखमींना जळगाव शासकीय रुग्‍णालयात हलवण्यात आले आहे.

 

निमखेडी (ता. जळगाव) येथील गणेश किसन कुंभार (३८) व प्रमिला गणेश कुंभार (३६) हे दाम्पत्य दुचाकी ( क्रमांक MH 19 L 1496) वरून न्हावी (ता. यावल) येेथे लग्न समारंभाकरीता जात होते. यादरम्यान यावल-फैजपूर रस्त्यावर हंबर्डी गावाच्या पुढे असलेल्‍या वळणावर ओमीनी गाडीशी ( क्रमांक MH 19 L 5285) त्‍यांचा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, यामध्‍ये दुचाकीचे हँडल तुटले व पुढील चाकही वेगळे झाले. यावेळी रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या या दाम्पत्यास ये-जा करणाऱ्यांनी तात्काळ फैजपूर येथे एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. येथे उपचारादरम्‍यान गणेश कुंभार यांची प्रकृती अधिक खालवल्यानेे त्यांना जळगाव येथे शासकीय रुग्‍णालयात हलवण्यात आले आहे.


पुढील स्‍लाइडवर पाहा, या भीषण अपघाताचे फोटोज...

 

 

बातम्या आणखी आहेत...