आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याबाबत व्हायरल झालेल्या कथित क्लिपसंदर्भात आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक, राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील आणि भाजपचे जिल्हा कोशाध्यक्ष लालचंद सैनानी या तिघांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


गांजा विक्री प्रकरणात अटक झालेल्याकडून पाच लाख प्रोटेक्शन मनी घेतल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. या प्रकरणात खोटे आरोप करून बदनामी केल्याची तक्रार वाघ यांनी अमळनेर पोलिसांत दिली अाहे. लालचंद सैनानी यांना पदावरून दूर केल्याने त्यांनी आरोपीशी संगनमत करून ध्वनिफीत तयार केली, असा वाघ यांचा आरोप आहे. 

बातम्या आणखी आहेत...