आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉश आऊटमध्ये अट्टल गुन्हेगार अटक; कट्टा, चॉपर, चाकू जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल पूनमचंद राठोड - Divya Marathi
अनिल पूनमचंद राठोड

जळगाव- एमआयडीसी पोलिसांनी रविवारी रात्री वॉश आऊट मोहीम राबवली. यात त्यांना मासुमवाडी परिसरात एक अट्टल गुन्हेगार मिळून आला. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला आहे. तर व शनिपेठ पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत तीन टवाळखोरांकडून दोन चॉपर, एक चाकू व ५ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. 


एमआयडीसी पोलिसांनी अनिल पूनमचंद राठोड (वय २८, रा.आंबेवडगाव, ता.पाचोरा) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. मासुमवाडी, तांबापुरा, रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी आदी भागात जाऊन पोलिसांच्या पथकाने तेथील गुन्हेगारांना तपासले. त्यात मासुमवाडी परिसरात राठोड हा फिरत असल्याचे दिसून आले.

 
पोलिस निरीक्षक अनिरुद्ध आढाव, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, किशोर पाटील, मनोज सुरवाडे, हेमंत कळसकर, अतुल पाटील यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा आढळून आला. राठोडसह पोलिसांनी कट्टा ताब्यात घेतला. रात्री उशिरा राठोड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. राठोड हा अट्टल गुन्हेगार असून चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्यामुळे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 


दोन चॉपर, चाकू 
शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे, उपनिरीक्षक सुरेश सपकाळे यांच्यासह डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री त्यांच्या हद्दीत वॉश आऊट मोहीम राबवली. यात लखन भगवान सारवान (वय २९, रा.गुरुनानकनगर) याची तपासणी केली असता त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला. भगवान सुकदेव सपकाळे (वय ३४, रा.कांचननगर) याच्याकडून एक चॉपर व ५ हजार ३०० रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. तर राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंखे (वय २३, रा.कांचननगर) याच्याकडून चॉपर जप्त केला. या तिघांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...