आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतुर्लीमध्‍ये केळी पिकवण केंद्रात सिलिंडरचा भीषण स्फोट; 2 जण जागीच ठार, 1 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर (जळगाव) - मुक्ताईनगर शहरपासून 25 किलोमीटर अंतरावरील अंतुर्ली येथे 12.45 वाजता लुकमान फ्रूट कंपनी केळी पिकवण केंद्रात सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्‍ये दोन कामगार ठार, तर एक जण जखमी झाला. या घटनेतील मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.


मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर रस्त्यावरील अंतुर्ली फाट्याजवळ लुकमान फ्रूट कंपनीचे केळी पिकवण केंद्र (बनाना रायपनिंग सेंटर) आहे. येथे कार्बनडाय अॉक्साईडचा वापर करून केळी पिकवली जाते. यासाठी केंद्रात 11 वातानुकुलित चेंबर तयार करण्यात आले आहेत. यापैकी बुधवारी दुपारी 12.45 वाजता चेंबर क्रमांक 5, 6 आणि 7 मधील एका सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघांचे शरीर छिनविछिन्न अवस्थेत पडलेले होते. तसेच चेंबर क्रमांक 1 जवळ उभी असलेली एक व्यक्ती जखमी झाली.


सिलिंडर स्फोट झाला तेव्हा केंद्राच्या आवारात एक अॅपेरिक्षा व दुचाकी उभी होती. स्फोटामुळे या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. दरम्यान, स्फोटाच्या आवाजामुळे अंतुर्ली ग्रामस्थ आणि महामार्गावरून ये-जा करणाऱ्या अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मुक्ताईनगरचे डीवायएसपी सुभाष नेवे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत कडुकार यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. खासदार रक्षा खडसे यांनी देखील घटनास्थळ गाठून पाहणी केली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनास्‍थळावरील फोटो व व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...