आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्‍ये तरुणाचा संशयास्‍पद मृत्‍यू, घातपात झाल्‍याचा कुटुंबीयांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दवाखान्यात पिंटू अडकमोल यांना तपासताना डॉ. रश्मी पाटील. - Divya Marathi
दवाखान्यात पिंटू अडकमोल यांना तपासताना डॉ. रश्मी पाटील.

यावल (जळगाव)– विरावली रस्त्यावर रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास 39 वर्षीय तरुणाचा संशयास्पद रित्या मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव पिंटू भगवान अडकमोल आहे. ते मोहराळा येथील रहिवासी आहे.


प्रथमदर्शनी दुचाकीचा अपघात झाल्याचे दिसत असले तरी घातपात झाल्‍याचा संशय मृत तरूणाच्या कुटुंबीयांनी व्‍यक्‍त केला आहे. तसेच काही संशयीतांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्‍यांनी केली आहे. पोलिसांकडून अपघात की घातपात यावर चौकशी सुरू आहे.


रविवारी पिंटू भगवान अडकमोल हे दुचाकीवरुन (क्रमांक एम. एच. 19 ए. एस.5367) यावलहून मोहराळा येथे जात होते. दरम्यान विरावली गावाजवळ रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला त्यांची दुचाकी उभी आढळली व दुचाकीशेजारी त्यांचा मृतदेह रस्‍त्‍याने ये जा करणाऱ्यांच्या निर्दशनास आला. ही माहिती मयताच्या कुटुंबीयांना देण्यात आली. तेव्हा कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पिंटू यांना येथील ग्रामिण रूग्णालयात आणले. येथे डॉ. रश्मी पाटील यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.

 

त्‍यानंतर रुग्‍णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. मयताचे वडील भगवान बालू अडकमोल यांनी आपल्या मुलाचा काही संशयीतांनी घातपात केल्याचा आरोप केला. हा अपघात नसुन खुन झाल्याचे त्यांनी सांगीतले. त्‍यानंतर सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश तांदळे आपल्‍या पथकासह घटनास्थळाचे निरिक्षण व पंचनामा करण्याकरीता रवाना झाले. मयताच्या डोक्याला तसेच उजवा हात व पायाला किरकोळ खरचटले असुन डोक्यात एका ठिकाणी जखम व कानातुन रक्त आलेले होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...