आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी भरताना विहिरीत काेसळून वृद्धेचा मृत्यू, शेंगाेळ्याची घटना; ग्रामपंचायतीवर तीव्र राेष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर- सार्वजनीक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृध्द महिलेचा विहिरीत पडून मृत्यु झाला. ही घटना गुरुवारी (दि.३) सकाळी १० वाजता जामनेर तालुक्यातील शेंगाेळा येथे घडली. गेल्यावर्षी याच गावात रुपाली लक्ष्मण ताठे ही युवती विहिरीत पडून गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला होता. 


शेंगोळा गावाला गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत अाहेत. घरात पिण्यासाठी पाणी नसल्याने नर्मदाबाई अानंदा अाढाव (वय ७०) ही वृद्ध महिला गुरुवारी सकाळी १० वाजता गावातील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली. बादलीने पाणी काढताना अचानक ताेल गेल्याने ती विहिरीत काेसळली. त्यात डाेक्याला विहिरीतील सिमेंटच्या पाइप लागल्याने या महिलेचा मृत्यू झाला. पहूर पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली. दरम्यान, नर्मदाबाई यांना मुले-मुली नसल्याने त्या स्वत: पाणी अाणण्याचे काम करायच्या. परंतु, टंचाईने त्यांचा जीव घेतला. 

बातम्या आणखी आहेत...