आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातील PNB च्या शाखेत भरदिवसा 10 लाखांची लूट; लुटारूंना पकडण्यात पोलिस अपयशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शहरातील भरवसाहतीत असलेल्या पंजाब नॅशनल बॅकेतुन भरदिवसा दहा लाख रुपये दोघांनी लुटून नेण्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करुनही दोघे लुटारु पोलिसांच्या हाती आले नाहीत.

 


शहरातील गल्ली क्रमांक सहा या ठिकाणी पंजाब नॅशनल बॅक आहे. या  ठिकाणी दुपारी नेहीमीप्रमाणे व्यवहार सुरू होते. यावेळी राखाटी व तपकीरी रंगाचे स्वेटर परिधान केलेले दोन जण बॅकेत आलेत. त्यांनी टोपी घातली होती. बॅक कर्मचारी बोलण्यात गुंतले असतांना पाहून त्यांनी दहा लाखांचा बंडल उचलुन पळ काढला. आराडाओरड झाल्यानंतर कर्मचारी त्यांच्या मागे धावले. परंतु सुभाष चौक मार्गे लुटारू पसार झाले. माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक दाखल झाले.तसेच ठसे तज्ञांना देखील बाेलविण्यात आले आहे. शिवाय सीसीटिव्ही फुटेजवरुन दोघांचा शोध घेणे सुरू होते. तसेच काही ठिकाणी नाकाबंदी ही करण्यात आली होती. परंतु उशिरापर्यत पोलिसांना लुटारू मिळाले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...