आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंचा अंजली दमानियांविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटविरोधात भाजप नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. खडसे हे शुक्रवारी न्यायालयात हा दावा दाखल करण्यासाठी आले होते. न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 


ते म्हणाले, दमानिया यांच्याविरोधात बदनामीचे २२ दावे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात की, मी न्यायालयाची दिशाभूल करून माझ्या समर्थकांनी आणखी एक वारंट काढले आहे. दमानिया यांच्याविरोधात माझ्या कार्यकर्त्यांनी २२ केसेस दाखल केलेल्या आहेत. त्यांनी ट्विटमधून थेट न्यायालयावर आक्षेप घेऊन अविश्वास दाखवला आहे. दबावाखाली वॉरंट बजावल्याचे त्यांचे म्हणणे आहे. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. खडसे न्यायालयावर दबाव आणू शकतात, असे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याविरोधात फौजदारी दावा दाखल केला आहे. त्यांनी माझ्याविरोधात अतिशय खालच्या स्तरातील शब्दांचा वापर करून न्यायालयात लढण्याचे आव्हान दिले आहे. 


खालच्या न्यायालयापासूनच हा लढा सुरू होतो. न्यायालयाचा निर्णय मान्य आहे. धनादेश प्रकरणाबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता चौकशी सुरू आहे. तपासात सत्य समोर येऊन संबंधितांवर गुन्हा दाखल होईल. चुकीचे असेल तर माझ्याविरुद्धही कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...