आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीचे आमिष दाखवून उपजिल्हाधिकाऱ्याचा विधवा महिलेवर चार वर्षे अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- विधवा महिलेस नोकरी लावून देण्याचे तसेच तिच्याशी लग्न करण्याचे आमिष देत तत्कालीन उप जिल्हाधिकारी साजिद पठाण यांनी डॉ. राजेश पाटील व शंभू सोनवणे यांच्या मदतीने महिलेवर चार वर्षे अत्याचार केले. या संदर्भात पीडित महिलेने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 


पीडित ३४ वर्षीय विधवा उस्मानिया पार्क भागात राहणारी आहे. साजिद अमानुल्ला पठाण (वय ५०, रा. शिवाजीनगर) यांच्याकडे २०१२मध्ये जळगाव मनपाचा प्रभारी सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार होता. या वेळी मनपातर्फे विधवा स्त्रीयांना शहरात घरकुल मिळेल, अशी जाहिरात वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली होती. ही जाहिरात पाहून काही महिला चौकशी करण्यासाठी पठाण यांच्या दालनात गेल्या होत्या. या वेळी पठाण याने या पीडित विधवा महिलेचा मोबाइल नंबर घेऊन नंतर भेटा असे सांगितले हाेते. यानंतर पठाण याने सातत्याने विधवा महिलेस फोनवरून संपर्क साधून नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. यानंतर २०१२मध्ये सोनवणे याच्या इंडिया गॅरेज परिसरातील घरी व कार्यालयात पीडित महिलेस नेऊन तिच्यावर पठाण याने जबरदस्तीने अत्याचार केले. या घटनेमुळे पीडितेची मानसिक स्थिती खराब झाली. त्यावर उपाय म्हणून पठाण याने महिनाभरात पीडितेशी लग्न करण्याचे आमिष दिले. त्यानुसार सरकारी वाहनाने औरंगाबाद येथे लग्नासाठी जात असताना सरकारी वाहनातच पुन्हा अत्याचार केले. महिनाभरानंतर पठाण यांनी डॉ. राजेश पाटील यांच्या दवाखान्यात अत्याचार केेला. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर तपास करत आहेत. 


मुुंबईत बदली झाल्यानंतर केली टाळाटाळ 
२०१६मध्ये पठाण यांची मुंबईत बदली झाली. यानंतर त्यांनी महिलेशी संपर्क तोडला. तसेच पीडितेला नोकरी दिली नाही किंवा लग्नही केले नाही. २०१२ ते २०१६ असे चार वर्षे अत्याचार करून आपला गैरवापर केल्याची खात्री पीडितेेस झाल्यानंतर तीने पोलिसांकडे तक्रार दिली. 

बातम्या आणखी आहेत...