आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शक डॉ. श्रीराम डाल्टन यांचा \'फ्री वॉटर इंडिया\'चा नारा, 7 राज्यांत 2 हजार किमी पदयात्रेवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्री वॉटर इंडियाचा नारा देत सात राज्यांच्या पदयात्रेवर निघालेले दिग्दर्शक डॉ. श्रीराम डाल्टन व सहकारी. - Divya Marathi
फ्री वॉटर इंडियाचा नारा देत सात राज्यांच्या पदयात्रेवर निघालेले दिग्दर्शक डॉ. श्रीराम डाल्टन व सहकारी.

यावल - मुंबापुरीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ.श्रीराम डाल्टन हे चित्रपट सृष्टीत जम बसलेला असताना भविष्यात निर्माण होऊ पाहणाऱ्या जल संकटाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी १५ मे पासून मुंबई ते झारखंड अशा ७ राज्यातील २ हजार किलोमीटर अंतराच्या पदयात्रेस निघाले आहे. 'फ्री वॉटर इंडिया' असा त्यांचा नारा असून सध्या ज्या पद्धतीने पाणी विक्रीचा व्यवसाय वाढत आहे, त्यावर डॉ.डाल्टन यांचा आक्षेप आहे.

 

गेल्या वर्षी 'स्प्रिंग थंडर' या चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी डॉ.डाल्टन यांना भविष्यातील जलसंकटाची जाणीव झाली. यानंतर त्यांनी विभू वध्स बिहार, विनीत चौधरी व शशिकांत कुमार या सहकाऱ्यांना सोबत घेवून चंदेरी दुनियेपासून लांब होत 'महाप्रकृती पर्व पदयात्रा' सुरू केली. 'फ्री वॉटर इंडिया'चा नारा देत १५ मे रोजी अंधेरी येथून ही पदयात्रा सुरू झाली. सोबत एका रथाची प्रतिकृती तयार करून त्यात १०० किलो वजनाचा दगड ठेवला. या दगडावर जल, जंगल, जमीन संरक्षणाचा संदेश चितारला आहे. नासिक, धुळे या दोन जिल्ह्यातून ही पदयात्रा जळगावमार्गे मध्य प्रदेशकडे रवाना झाली. ७ राज्यातील २ हजार किमीचा प्रवास करून या पदयात्रेचा झारखंड व छत्तीसगडच्या सिमेवरील बुढापहाड येथे समारोप होईल.

 

म्हणून पडले 'डाल्टन' नाव

डॉ.श्रीराम हे झारखंडमधील पालामु जिल्ह्यातील माओवाद्याचे वास्तव्य असलेल्या डाल्टन गंज येथील रहिवासी आहेत. त्यांनी 'गँग ऑफ वासेपूर' या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत कारकीर्दीला सुरुवात केली. डाल्टन गंजचे राहणारे असल्याने त्यांच्या नावापुढे 'डाल्टन' असे बिरुद चिपकले. सहदिग्दर्शक म्हणून सन २००४ मध्ये कामाला सुरुवात केली. कालांतराने महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, अनिल कपूर, सुनील शेट्टी, नवाजोद्दीन सिद्दीकी अशा दिग्गज कलावंतांसोबत काम केले. सन २०१३ मध्ये 'द लास्ट बहुरुपिया' या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर लघुपट दिग्दर्शक म्हणून डॉ. श्रीराम डाल्टन हे नाव चित्रपट सृष्टीत चर्चेला आले. त्यांच्या पत्नी मेघा यांनी अजय देवगण यांच्या 'शिवाय' चित्रपटात पार्श्वगायन केले आहे.

 

दगड आस्थेचे प्रतीक

१०० किलो वजनाचा दगड सोबत घेवून फिरताना पाहून अनेकांना डॉ.डाल्टन यांचे कुतुहल वाटते. जल, जंगल, जमीन संवर्धनाबाबत कलात्मक संदेश कोरलेला हा कृत्रिम दगड नाशिक येथील नीलेश धीरे यांनी तयार केला आहे. दगड आपल्या देशात आस्थेचे प्रतिक मानला जातो. अनेक धर्मियांची दैवतं, मूर्ती दगडनिर्मित असते. जल, जंगल, जमीन हे देवच आहेत. लोकांमध्ये त्यांच्याप्रती आस्था वाढावी म्हणून दगड सोबत घेतल्याचेे डॉ.डाल्टन सांगतात. हाच दगड घेवून त्यांची पदयात्रा मालेगावात पोहोचली. मात्र, मुलं पळवणारी टोळी आल्याची अफवा सर्वत्र पोहोचल्याने त्यांना नाहक डोकेदुखी झाली. पोलिसांनी त्यांना तब्बल ४ तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...