आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेचिंग क्लास माफियांच्या जाळ्यात अडकून पडू नका; 'सुपर थर्टी'चे संस्थापक अानंदकुमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- ‘काेचिंग माफियांचा सुळसुळाट वाढला अाहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्केटिंग करून विद्यार्थ्यांना जाळ्यात अाेढणारे काेचिंग क्लासवाले विद्यार्थ्यांना लुबाडतात. काही भावनिकतेला हात घालून विद्यार्थी गळाला लावतात. असे साेंग घेतलेल्या काेचिंग माफियांच्या जाळ्यात येऊ नका. अापले उद्दिष्ट डाेळ्यासमाेर ठेवून राष्ट्र उभारणीमध्ये सहयाेग द्या,’ असे अावाहन  बिहार येथील “सुपर थर्टी’चे संस्थापक अानंदकुमार यांनी रविवारी जळगावात केले.   


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५२व्या प्रांत अधिवेशनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते.  पाटण्यासारख्या शहरामध्ये गरीब विद्यार्थ्यांना माेफत शिक्षण देताना काेचिंग माफियांकडून माझ्यावर हल्ले झाले, असेही त्यांनी सांगितले.   सध्या शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे फंडे वापरून विद्यार्थ्यांना लुटणारी काेचिंग माफियांची टाेळी सक्रिय झाली अाहे. मात्र माझे काम बघून मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन अशा अनेकांनी  मला देणग्या देण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु मी कुणाकडून एक रुपयादेखील घेतला नाही. काेचिंग क्लासेस उघडून काश्मीर ते कन्याकुमारी त्यांच्या फ्रँचायझी देऊन देशभर जाळे वाढवण्याची संधी हाेती, परंतु ती नाकारून मी पाटण्यात माझ्या कुवतीप्रमाणे विद्यार्थी घडवण्याचे काम सुरू ठेवले, असे अानंदकुमार म्हणाले.


महाराष्ट्राचे हृदय माेठे...     
विद्यार्थी परिषदेत राष्ट्रवाद अाहे. येथे प्रांतिक वादाला थारा नाही. काही लाेक उगीच अफवा पसरवण्याचे काम करीत असतात. यूपी बिहारच्या लाेकांना महाराष्ट्रात वाईट वागणूक मिळत असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात महाराष्ट्राचे हृदय विशाल अाहे. महाराष्ट्र पातळीवरच्या अधिवेशनासाठी उद््घाटक म्हणून माझ्यासारख्या सामान्य बिहारी व्यक्तीला येथे बाेलवून सन्मान करण्यात अाल्याबद्दल अानंदकुमार यांनी अायाेजकांचे अाभार मानले.

बातम्या आणखी आहेत...