आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात जाताना मद्यपीने धावत्या रिक्षेतून घेतली उडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दारूच्या अड्ड्यावर झालेल्या भांडणात जखमी झालेल्या मद्यपीस एमआयडीसी पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात रवाना केले होते. दरम्यान, रुग्णालयात रिक्षा येताच या मद्यपीने धावत्या रिक्षेतून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. त्याला धड उभे राहता येत नसल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

सुभाष मधुकर मराठे (रा.रामेश्वर कॉलनी) असे जखमी मद्यपीचे नाव आहे. शनिवारी सकाळी मेहरूणमधील एका दारूच्या अड्ड्यावर मराठे याने गोंधळ घातल्यामुळे नीलेश हरसूल नावाच्या तरुणाने त्यास मारहाण केली होती. यात मराठे याच्या डाव्या डोळ्याजवळ दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला होता. अशाच अवस्थेत त्याने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले होते. दारूच्या नशेत तर्र असलेल्या मराठेच्या डोळ्याजवळून येणारे रक्त पोलिस ठाण्यातील टेबलवर टपकत होते. पोलिसांनी त्याला उपचार करण्यासाठी रिक्षातून रुग्णालयात पाठवले. रिक्षातून उडी मारुन पळून जात असताना पकडून त्याला रुग्णालयात दाखल केले.

 

बातम्या आणखी आहेत...