आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव डंपरची चारचाकीस धडक; दुचाकींना मारला कट, अनर्थ टळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जुना खेडीरोड परिसरातील योगेश्वरनगर येथे भरधाव डंपरने चारचाकीस धडक दिली. यानंतर चालक न थांबता पळून जात असताना दोन दुचाकींना कट मारला. यात सुदैवाने दुचाकीस्वार बचावले. अखेर नागरिकांनी डंपरचालकास पकडून चोप दिला. बुधवारी दुपारी ४.४५ वाजता हा थरार घडला.

 

खेडी परिसरातून वाळूने गच्च भरलेला एक डंपर (एमएच-१९ झेड-४७९६) योगेश्वरनगर येथून भरधाव जात होता. याच वेळी समोरुन येणाऱ्या एका चारचाकीस (एमएच १९ बीएन १२१२) डंपरने धडक दिली. चारचाकीचालकाने प्रसंगावधान राखून चारचाकी रस्त्याच्या कडेला वळवल्याने या धडकेत जास्त नुकसान किंवा कोणाला दुखापत झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...