आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांकडे महापालिकेचे माेठे गुपित, उघड केल्यास 100 जण जातील जेलमध्ये; खडसेंचा गाैप्यस्फाेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव महापालिकेतील एक अत्यंत गंभीर प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे अाहे. मुख्यमंत्र्यांनी हे गुपित बाहेर काढताच ६० ते १०० जण २४ तासांमध्ये जेलमध्ये जातील. हे सिक्रेट 'सिक्रेट'च रहावे, म्हणून महापालिकेतील विद्यमान सत्ताधारी भाजपसाेबत युतीच्या प्रयत्नात असल्याचा गाैप्यस्फाेट माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी केला. 'मुक्ताई' बंगल्यावर बुधवारी खडसे यांनी निवडक पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. त्यावेळी आगामी महापालिका निवडणूक, खान्देश विकास आघाडीच्या नेत्यांची शिवसेनेच्या नावाखाली भाजपसोबत युती करण्याची घाई, जिल्ह्यातील पाणीटंचाई आदींबाबत परखडपणे मते मांडली. ती त्यांच्याच शब्दात...


नेत्यांमध्येच आत्मविश्वास नाही
महापालिकेतील युतीसंदर्भात अामच्या काेणत्याही कार्यकर्ता अथवा पदाधिकाऱ्याने माझ्याकडे विषय काढलेला नाही. परंतु, हे खरे अाहे की, अाम्ही विराेधी पक्षात असताना जळगाव महापालिकेत पहिला लाेकनियुक्त नगराध्यक्ष भाजपचा बसवला. सध्या राज्यात अाणि देशात भाजपचे सरकार असल्याने विकासाला अाणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरवण्याची वेळ अाहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या स्वबळावर लढण्याच्या भावना असाव्यात. परंतु अलीकडे नेत्यांमध्ये निवडणूक लढण्याचा फारसा अात्मविश्वास दिसत नाही. परिणाम, निकालाची पर्वा न करता नेत्यांनी कार्यकर्त्यांना लढण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा दिली पाहिजे. परंतु अलीकडे तसे हाेताना दिसत नाही. सहा महिने अाधीपासून वातावरण निर्मिती हाेणे अावश्यक असताना अद्याप कार्यकर्ते युती करावी किंवा नाही या संभ्रमात अाहेत. मी शहराचे अामदार सुरेश भाेळे यांच्यासह मुख्यमंत्र्यांना भेटलाे, त्या वेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, असे म्हटले हाेते. त्यानंतर हा विषय माझ्याकडे अाला नाही.

 

ज्यांच्यासाठी वाईटपणा घेतला त्यांनी हे दिवस अाणले
मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गुपिताशी माझा संबंध नाही. महापालिकेत मी लक्ष घातलेले नाही. या पूर्वी संघर्ष करताना अनेकांशी दुष्मनी घेतली. जळगाव शहरात माजी अामदार सुरेश जैन यांच्याशी माझे वैयक्तिक वैर नाही. परंतु, पक्षासाठी त्यांच्याविराेधात माेर्चा उघडला हाेता. अाता मात्र काेणाशीही वाईटपणा घ्यायचा नाही. वाईटपणा कुणासाठी घ्यायचा, हा देखील प्रश्न अाहे. ज्यांच्यासाठी वाईटपणा घेतला त्यांनीच हे दिवस अाणल्यामुळे माझी व्यक्तिगत नाराजी आहे.

 

विद्यमान सत्ताधारी अडकले
जळगाव महानगरपालिकेसंदर्भातील एक माेठे गुपीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अाहे. कदाचित याेग्यवेळी ते या गुपितांचा उपयाेग करणार असतील. त्यांनी गुपित बाहेर काढून प्राथमिक कारवाई केली, तरी महापालिकेतील महत्त्वाचे ६० ते १०० जण २४ तासांमध्ये तुरुंगामध्ये जातील. महापालिकेतील विद्यमान सत्ताधारी या प्रकरणात अडकले अाहेत. या प्रकरणाचे चार चाैकशी अहवाल उपलब्ध अाहेत. मुख्यमंत्री याेग्यवेळी या गुपितांचा उपयाेग करतील, ते मी सांगणे याेग्य नाही.

 

मंत्रिपद दिले तर ठिक, अपेक्षा नाही
मंत्रिपदाबाबत विचारले असता, त्यांनी मंत्रिपदाबाबत काेणतीही अपेक्षा नसल्याचे खडसे यांनी सांगितले. पक्षाने जबाबदारी दिली तर काम करायचे, नाही दिली तरी पक्षाचे काम सुरूच अाहे. त्यामुळे मंत्रिपद मिळाे अथवा न मिळाे, काेणतीही अपेक्षा नाही.

 

बातम्या आणखी आहेत...