आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसे यांनी केली सरकारच्या कामाची प्रशंसा, म्हणाले- 15 वर्षात झाले नाही ते 4 वर्षांत केले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा- उपजिल्हा रुग्णालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार आणि कृत्रिम अंग निर्माण निगम जबलपूर यांच्यामार्फत भारत सरकारच्या एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांग रुग्णांसाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून शिबिर घेन्यात येत असून या कार्यक्रमाला उदघाटक जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना चंद्रकांत पाटील,व जलसंपदा मंत्री ना गिरीश महाजन तर कार्यक्रम अध्यक्ष माजी मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला अध्यक्षीय भाषणातून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज चोपडा उपजिल्हा रुग्णालयात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राज्य सरकार व केंद्र सरकारचे कामाचे कौतुक केले आहे. 

 

मंत्रीपद गेल्या पासून एरवी फडणवीस सरकारवर खडसे हे कुठेही टीका करण्याची संधी सोडत नसताना आज मात्र चोपड्यात दिव्यांग शिबिरात अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री खडसे यांनी सांगितले की,दिव्यांगांसाठी राज्य व केंद्र सरकारने चांगले निर्णय घेतले असून अपंगांना त्याचे जीवन समृद्ध करण्यासाठी आत्मविश्वासाने जीवन जगता यावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून देशात अनेक ठिकाणी वेगवेगळी शिबिरे घेऊन अनेकांना सोयी सुविधा पुरविण्याचे काम सुरू आहे. जे पंधरा वर्षात झाले नाही ते या चार वर्षात सरकारने चांगले निर्णय घेतले असून अनाथांना नाव देण्याचे काम सरकारने घेतले आहे. अनाथांसंदर्भातील चांगले निर्णय घेतल्याने मी स्वतः मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले होते.तसेच गिरीश महाजन यांचे देखील मोठे काम असून खडसे यांनी गिरीश महाजन यांचे देखील यावेळी कौतुक केले


बोगस दिव्यांग शोधून त्यांना जेलमध्ये टाका
आज अनेक शासकीय नोकऱ्या मध्ये काम करताना अंध,अपंग,चे बोगस सर्टिफिकेट घेऊन नोकरी करत असून अश्या लोकांना जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांनी शोधून त्यांना जेल मध्ये टाका.जेणे करून खरे दिव्यांग याना त्या गोष्टीचा लाभ मिळेल असे माजी मंत्री खडसे यांनी सांगितले

 

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की,या शिबिरात खूप आशेने लोक येतात मात्र त्यांना चांगली सेवा द्या.सामाजिक काम केल्याचे आशीर्वाद हे निश्चित मिळतात.उत्तम असे शिबीराचे आयोजन या ठिकाणी सुरू असून चाळीसगांवात देखील मीनाक्षी निकम यांचे कपडे शिवण्याचे काम सुरू आहे.जळगावात यजुर्वेद महाजन यांचे अपंगांसाठी चांगले मार्गदर्शन करून त्याच्या मार्गदर्शनाणे अनेक जण आज शासकीय सेवेत काम करता आहेत.
 


भाजप सेनेच्या कार्यकत्याना कामे सांगा-गिरीश महाजन
सरकारचा दृष्टीकोन हा संवेदनशील असून राज्यात अंध,अपंग, कर्णबधिर आदी सर्व आजारावर उपाययोजना बाबत सरकार अतिशय संवेदनशील असून कोट्यवधी लोकांच्या सेवा या चार साडे चार वर्षात कामकाज झाले आहे.जळगाव जिल्हयात तज्ञ डॉक्टरच्या माध्यमातून विविध आजारावर शिबिरे  कँप,घेण्यात आलीत.सरकार आपल्या
आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे आहोत कुणीही डगमगू नका.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोठा निधी जळगाव जिल्हयात आणला गेला आहे.आमच्या पर्यत या भाजप सेनेच्या कार्यकर्ते ना कामे सांगा,असेही ना गिरीश महाजन यांनी सागितले.यावेळी शिबिराचे माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली होती.यावेळी मंचावर भाजप नेते घनश्याम अग्रवाल, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, आमदार हरिभाऊ जावळे अन्य नेते उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...