आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार भोळेंच्या लेटरहेडचा वापर करून एकनाथ खडसेंची बदनामी, जळगावात गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आमदार सुरेश भोळे यांचे लेटरहेड वापरून माजी मंत्री एकनाथ खडसे यांची बदनामी करणाऱ्या पत्रावरून सोमवारी विधानसभेत गदारोळ झाला. आमदार भोळे यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. याची दखल घेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, याबाबत रात्री उशिरा जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडचा वापर करून माजी मंत्री खडसे यांची बदनामी करणारे पत्र सर्व आमदार तसेच न्यायालयांना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती आमदार सुरेश हळवणकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली. आमदार भोळे यांनी यासंदर्भात जळगाव पोलिसांकडे बनावट पत्राची तक्रारही केली आहे. मात्र, अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याप्रश्नी खडसेंनीही तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.गेल्या ४० वर्षांपासून सार्वजनिक जीवनात वावरत आहे. मात्र, ३८ वर्षांत आपल्यावर कुठलेच आरोप झाले नाहीत. पण आता असे काय घडले की एकामागोमाग आरोप होत आहेत? या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, याबाबत अामदार भाेळे यांनी दाेन दिवसांपूर्वी पाेलिस अधीक्षकांकडे तक्रार केली हाेती. त्यानुसार जळगाव जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात अामदार भाेळेंच्या फिर्यादीवरून लेटरहेडचा गैरवापर केल्याप्रकरणी अज्ञात अाराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. रात्री जिल्हापेठ पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 


विरोधकांनी घातला गोंधळ 
खडसेंच्या भावनेशी सहमत होत विरोधी पक्षाने सरकारवर टीका करत गोंधळ घातला. या तक्रारीवर आजच गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांनी केली. यावर हरिभाऊ बागडे यांनी गुन्हा दाखल न होणे ही गंभीर बाब असून सरकारने निवेदन करावे, असे सांगितले. त्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...