आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचारसंहिता भंगप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्षांना आयोगाकडून नोटीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शासकीय निवासस्थानी बुधवारी मनपा निवडणुकीशी संबंधित भाजपची बैठक घेतल्याप्रकरणी जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना मनपा निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी गुरुवारी आचारसंहिता भंगाची नोटीस बजावली . या नोटिशीला आठ दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देशही आयोगाने दिले आ हेत. तसेच याप्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. 


महापालिका निवडणुकीच्या नियाेजनासंदर्भात भाजपतर्फे बुधवारी जबाबदारी वाटपासाठी बैठकीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या बंगल्यावर ही बैठक घेण्यात अाली. या वेळी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशाेर महाजन, सभापती पाेपट भाेळे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, जे. के. चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते. पदाधिकाऱ्यांना जळगाव महापालिकेच्या प्रभागनिहाय जबाबदारींचे वाटप करण्यात अाले होते. मनपा निवडणुकीत भाजपतर्फे होत असलेल्या आदर्श आचार संहिता भंगाबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय सचिव संजय प्रभाकर चव्हाण यांनी आचार संहिता कक्षाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आचार संहिता कक्ष प्रमुखांनी ही नोटीस बजावली आहे. 

बातम्या आणखी आहेत...