आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारयाद्यांत चुका; कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना निलंबित करण्याचे अादेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात अालेल्या अंतिम मतदार यादीला झालेला उशीर व त्यातील चुकांमुळे निवडणूक अायाेगाचे अायुक्त जे. एस. सहारिया चांगलेच संतापले. मतदार यादीच्या कामाला फार महत्त्व न देता हलक्याने घेतल्याचा ठपका ठेवला. पालिकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मस्ती अाली अाहे. पालिकेच्या कारभारामुळे अंतिम मतदार यादी मॅन्युअली करण्याचे अादेश द्यावे लागल्याने नाराजी व्यक्त केली. कामात कुचराई करणाऱ्यांना जागेवर निलंबित करण्याचे अादेश अायुक्त सहारिया यांनी दिले.

 

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कामाचा अाढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक अायाेगाचे अायुक्त जे. एस. सहारिया बुधवारी जळगाव दाैऱ्यावर अाले हाेते. त्यांनी सकाळी ९ वाजता नियाेजन मंडळाच्या सभागृहात मुख्य निवडणूक निरीक्षक प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर, मुख्य निवडणूक अधिकारी तथा पालिका अायुक्त चंद्रकांत डांगे, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, खर्च निरीक्षक, पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी निवडणूक अायुक्तांनी प्रमुख अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. यात काही अधिकारी गैरहजर असल्याने नाराजी व्यक्त केली.

 

कामाचा अाढावा : पालिका निवडणुकीत अाचारसंहितेच्या अंमलबजावणीसंदर्भात अाढावा घेतला. मतदारांना प्रलाेभन देणे, पैशांचे वाटप हाेणे अादी प्रकार घडतात; त्याला अाळा घालण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्याचे अादेश दिले. खर्च निरीक्षकांनी उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवावे. निवडणूक नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना निवडणूक अायाेगाचे अायुक्त सहारिया यांनी सांगितले.

 

काम लाइटली घेतले
अायुक्त सहारिया यांनी मतदार यादीला उशीर का झाला, असा प्रश्न केला. पालिकेने कंट्राेल चार्ट व्यवस्थित न दिल्यामुळे सर्व काही घडल्याचा ठपका ठेवला. मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदार यादीचे काम सहज घेतल्याने नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मस्ती अाली अाहे. निवडणुकीच्या कामात चुका करतात. सर्व्हिस वाेटर्सचे नाव व पत्ते सापडत नाहीत. अशा ६५ मतदारांचा अाकडा कसा अाला. पालिका व जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय नसल्याचेही ते म्हणाले.


अडचण येत हाेती तर मुंबईला का अाले नाही ?
मुदतीत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध न हाेण्यामागची कारणे विचारण्यात अाली. यात अायाेगाकडून नावांची संख्या कमी अधिक हाेत असल्याचा मुद्दा मांडण्यात अाला. त्यानंतर अायाेगानेच अादेश दिल्यामुळे मॅन्युअली यादी तयार केल्याचे सांगितले. त्यावर सहारिया यांनी मतदार यादीच्या कामात चुका असल्यामुळेच अापण स्वत: यादी मॅन्युअली करण्याचे अादेश दिल्याचे सांगितले. मतदार यादीत अडचण येत हाेती तर थेट मुंबईला का अाले नाहीत, असा सवालही अायुक्त सहारिया यांनी केला. पालिकेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस न देता थेट जागेवर निलंबन करा, अशा सूचना अायुक्त डांगे यांना दिल्या.

 

बातम्या आणखी आहेत...