आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबारसह पालघर जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या मतदानाच्या तारखांमध्ये बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- महाराष्ट्रातील मुदत संपणाऱ्या पालघर जिल्हातील डहाणू, जव्हार आणि नंदुरबार जिल्हातील तळोदा नगर परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्‍यात आला आहे. काही उमेदवारांच्या बाबतीत न्यायालयीन प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे महाराष्ट्र नगर परिषद निवडणूक नियम 1966 मधील नियम क्र (ड) मधील तरतुदी विचारात घेता तिन्ही नगर परिषदांसाठी होऊ घातलेल्या मतदानाच्या तारखांमध्ये बदल करण्‍यात आला आहे. मतदान 13 ऐवजी 17 डिसेंबरला (रविवार) घेण्याचे तातडीने आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

 

तळोदा नगर पालिकेचा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या छानणीच्या वेळी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत बबनराव माळी यांचा अर्जावर भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय छबुलाल परदेशी यांनी तर प्रभाग क्र. 1 ब मधील नगरसेवक पदांचे उमेदवार योजना भरत माळी यांचा अर्जावर भाजपाचे उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी यांनी आणि प्रभाग क्र. 9 ब मधील संजय बबनराव माळी यांचा अर्जावर भाजपाचे किरण अशोक सुर्यवंशी यांनी हरकत घेतली होती. त्यावेळी काँग्रेस व भाजपचा वकिलांनी आपापल्या उमेदवारांचा बाजूने युक्तिवाद केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांनी त्यावेळी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकूण घेतला व त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करीत काँग्रेसचा उमेदवारांवर घेण्यात आलेले सर्व आक्षेप फेटाळत त्यांचे अर्ज मंजूर केलेत. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

 

याबाबत सत्र न्यायालयाने 4 डिसेंबरला निकाल दिला होता, त्यात काँग्रेसच्या भरत माळी व संजय माळी यांच्यावर घेण्यात आलेली हरकत फेटाळण्यात आली होती, तर नगरसेवक पदांचे उमेदवार योजना भरत माळी यांच्यावरील हरकत मान्य करण्यात आली होती.

 
तळोदा नगरपरिषदच्या प्रभाग क्रमांक 1(ब) व 9(ब) तसेच अध्यक्षपदाचा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रावर झालेल्या आपिलामुळे जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मतदान तारखेत बदल करणे आवश्यक होते. त्यामुळे राज्यनिवडणूक आयोगाने तळोदा नगर पालिकेसह डहाणू व जव्हार नगरपालिकेचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे.

डहाणू व जव्हार पालिका निवडणूक कार्यक्रमात देखील बदल करण्यात आला आहे.

 

डहाणू येथील प्रभाग क्रमांक 1 (ब) 2(ब) 9 (अ) 10 (ब)12 (ब) तसेच जव्हार नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 4 (ब) 7 (ब) 8 (क) येथील अपिलांचा समावेश आहे. त्यामुळे या तिन्ही पालिकेचा निवडणूक कार्यक्रमात बदल करून नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...