आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी घसरली; डंपरच्या चाकात अाल्याने माजी सैनिक जागीच ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील अजिंठा चौफुलीपासून जवळच ममता हाॅस्पिटलसमोरील महामार्गावर डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार माजी सैनिकाचा मृत्यू झाला. भरधाव डंपरचालकाने ब्रेक न दाबल्याने सैनिकाच्या चेहऱ्यावरून चाके गेली. साइडपट्ट्या खोल गेल्यामुळे महामार्गावर उंचवटे तयार झाले आहेत. यावरुन दुचाकी घसरल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडून पेटवण्याचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी १ वाजता हा अपघात घडला. 


सुरेश लोटन मराठे (वय ४५, रा.यशवंतनगर) असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे. ते सध्या खासगी कंपनीच्या माध्यमातून एसटी वर्कशॉप येथे सुरक्षारक्षकाचे काम करीत होते. मूळ थाळनेर (ता. शिरपूर) येथील मराठे कुटंुबीय गेल्या १० वर्षांपासून जळगावात स्थायिक आहेत. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर मराठे यांनी सुरक्षारक्षकाचे काम सुरू केले होते. 


मृताची कौटंुबिक पार्श्वभूमी 
मराठे हे माजी सैनिक होते. पत्नी भारती या शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरी करतात. तर त्यांचा एकुलता मुलगा विक्की हा पुण्यात खासगी कंपनीत अाहे. रामानंदनगर परिसरात मराठे यांचे नातेवाईक राहतात. त्यांची बहीण घराशेजारी राहते. त्यांचे चार भाचे बाहेरगावी असल्यामुळे कुटंुबीयांना रुग्णालयात पोहचण्यास उशीर झाला. तर पुण्यातील मुलास फोनवरुन माहिती देण्यात आली. दुपारी त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात पाेहाेचून प्रचंड अाक्राेष केला. 

बातम्या आणखी आहेत...