आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्‍ये विहिरीतील मोटार चालू करताना शेतक-याला वीजेचा धक्‍का, जागीच ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव) - तालुक्यातील मनवेल येथे एका शेतकऱ्याला शेत विहिरीतील मोटर चालू करण्यासाठी जात असताना शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. राजेंद्र शांताराम पाटील (42) असे मृत्‍यूमुखी पडलेल्‍या शेतक-याचे नाव आहे. याप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

मनवेल गावापासून सुमारे काही अंतरावर गट क्रमांक 116 या शेतातच राजेंद्र हे कुटुंबासह राहतात. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घरात पाणी भरायचे असल्याने ते शेतविहीर मधील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. दरम्यान जवळील इलेक्ट्रिक खांबावरील ताराला त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. यामध्‍ये ते जागीच ठार झाले. ही घटना घडतात त्‍यांच्या कुटुंबीयांनी गावात कळवले व त्यांना तात्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अशाप्रकारे अकस्मात मृत्यू झाल्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...