आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात शेतक-याची कु-हाडीने वार करुन हत्या, तीन आरोपी अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- तालुक्यातील मुकटी गावातील  शेतकरी देविदास पवार याच्यावर तीन हल्लेखोरांनी रात्री हल्ला  कु-हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात देविदास (47) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असेलेला दगडू भिल नावाचा इसम किरकोळ जखमी झाला. पोलिसांनी दगडू भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच गावातील तीन जणांना अटक केली. तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. पोलिसांनी ही हत्या पूर्व वैमन्यस्यातून केली शक्यता वर्तवली आहे. या प्रकरणी तपास सुरु आहे. 

बातम्या आणखी आहेत...