आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेर धरणातून पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको, हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गलंगी ता चोपडा येथे बारा गावांमधील रास्ता रोखो.... - Divya Marathi
गलंगी ता चोपडा येथे बारा गावांमधील रास्ता रोखो....

चोपडा - अनेर धरणातून अनेर नदीत तात्काळ पाणी सोडण्यासाठी चोपडा तालुक्यातील 10 ते 12 गावाच्या शेतकऱ्यांनी आज सकाळी 9 वाजता रास्ता रोको आंदोलन केले.

 गंलगी गावाजवळ बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्यावर हे आंदोलन करण्‍यात आले. राज्याचे सुकाणू समितीचे सदस्य एस. बी. पाटील व चोसाका व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, किरणसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला.


यावेळी शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, अनेर धरणाचे शाखा अभियंता पी बी पाटील, उपअभियंता व्ही एस पाटील यांना पाणी केव्हा सोडणार म्हणून विचारले. यावेळी त्यांनी लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.


घोडगाव, गलगी, कुसुंबे, गणपूर, भवाळे, वेळोदा, अनवर्धे बु, दगडी, मोहिदा, अजतीसिम, वढोदा, विटनेर, वाळकी, मालखेडा या गावातील हजारो शेतकरी आजच्या रास्ता रोको मध्ये सहभागी झाले होते. पाणी मिळावे म्हणून सात ते आठ ग्रामपंचायतीचे ठराव चोपडा तहसीलदाराना आंदोलन स्थळी देण्यात आले.

 

गिरीश महाजन यांच्याशी संवाद 
यावेळी आंदोलन कर्त्याशी बोलून भाजप नेते घनश्याम अग्रवाल यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना फोन करून या बारा गावांना भीषण पाणी टंचाई आहे म्हणून अनेर धरणातून पाणी सोडावे म्हणून विनंती केली. यावर गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे घनश्याम अग्रवाल यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष आत्मराम म्हाळके, राजू ढाबे उपस्थित होते.

 

आज गलंगी येथे बारा गावातील नागरिकांनी पाण्यासाठी रास्ता रोखो केला ते प्रमुख पदाधिकारी माझ्या कडे आले होते.पाणी टंचाई ही भीषण समस्या असून प्रश्न सुटावा व अनेर धरणातून पाणी सोडण्यात यावे यासाठी ना गिरीश महाजन यांचेशी मी स्वतः बोललो व त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेऊन पाणी सोडण्या बाबत सकारात्मक दाखविली आहे.

- घनश्याम अग्रवाल, भाजप नेते (चोपडा)

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आंदोलनाचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...