आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Father And Son Murdered In Dhule, धुळ्यात पूर्ववैमनस्यातून पिता पुत्राची हत्या

धुळ्यात पूर्ववैमनस्यातून पिता-पुत्राची हत्या; महिनाभरापूर्वीच झाला होता मुलाचा विवाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शहरातील देवपूर परिसरातील वानखेडकरनगरात पूर्ववैमनस्यातून प्रथितयश वैभव व रावसाहेब पाटील या पित्रा- पुत्रांची सायंकाळी हत्या करण्यात आली. पाटील कुटुंबाशी जवळीक असलेला अाकाश पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. दोन दिवसांपूर्वी परस्परांकडे पाहण्यातून झालेला वाद खुनाचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते आहे. मृत वैभवचा गेल्या महिन्यात ८ मे रोजी विवाह झाला होता. जयराज, अमित, भूपेश, हर्षल अशी काही मारेकऱ्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर संशयित बाजीराव पवार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर मुख्य संशयित जयराज याला रात्री उशिरा पारोळा येथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


शहरातील दत्त मंदीर जीटीपी स्टॉपपासून काही अंतरावर रावसाहेब पाटील यांचे निवासस्थान आहे. याठिकाणी ते मुलगा वैभव व कुटुंबीयासह राहतात. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मुलगा वैभव ( वय २४) हा घराकडे येत असतांना त्याच्यावर तलवार व इतर घातक शस्त्रांनी वार करण्यात आला. रक्तबंबाळ झालेल्या वैभवला पाहून रावसाहेब पाटील (वय ५५) व आकाश पाटील (वय 14) हे घराबाहेर पडले. याचवेळी रावसाहेब पाटील यांच्या डोक्यावर मागून तिक्ष्ण वार करण्यात आला. तसेच, आकाशच्या डोक्यावर देखील वार करण्यात आले. यानंतर मागेरकरी पसार झाले. घटनेनंतर कुटुंबीयांनी तिघांना पांझरा किनारी असलेल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, सुरु करण्यापूर्वीच वैभवचा मृत्यू झाला होता. तर राहवसाहेब यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.  याशिवाय आकाशची प्रकृती गंभीक होती. घटेनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी ताफ्यासह आले. संशयितांचे नावे घेऊन त्याचा शोध सुरू केला.  त्यानंतर संशयित जयराज पाटील नामक तरूणाच्या घरातून काही तलवारी जप्त करण्यात आल्या. रात्री उशीरापर्यंत रूग्णालयाबाहेर गर्दी होती. या प्रकरणी पश्चिम  देवपूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरात होता दबदबा 
प्रथितयश रावसाहेब पाटील यांचे शहरात राजकीय व सामाजिक क्षेत्रात वलय होते. शहरात एक काळ त्यांनी गाजवला होता. वयोमानानुसार त्यांना रक्तदाबाची व्याधी जडली होती. त्यामुळे त्यांचे रक्त पातळ होत असे. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांची औषधे सुरू होती. रावसाहेब यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. परिणामी त्यांना वाचविणे अशक्य झाले, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...