आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या वडिलांना कळले मुलाच्या मृत्यूचे वृत्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बेपत्ता मुलाविषयी शुक्रवारी वर्डी येथील पोलिस पाटील व त्याचे वडील अडावद पोलिस ठाण्यात हरवल्याबाबत तक्रार देण्यासाठी गेले हाेते. या वेळी त्यांना ९ दिवसापूर्वीच मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याने धक्का बसला. संदीप पाटील असे मृताचे नाव अाहे. ताे १ मार्च राेजी लालमाती येथे जखमी अवस्थेत अाढळून अाल्याने त्याला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. त्याची अाेळख न पटल्याने पाेलिसांनी त्याचा दफनविधी केला हाेता; पण शुक्रवारी तरुणाची अाेळखपटल्याने सायंकाळी ६.३० वाजता तहसीलदारांच्या परवानगीने मृतदेह बाहेर काढून ताे नातेवाईकांच्या स्वाधीन केला.

 

चोपडा तालुक्यातील लालमातीजवळ २८ फेब्रुवारी रोजी संदीप भास्कर पाटील (वय ३०, रा.वर्डी) हा तरुण जखमी अवस्थेत एका दुचाकीस्वाराला आढळून आला होता. त्याच्या पायाला, डोक्याला मार लागलेला होता. याविषयी दुचाकीस्वाराने देवगावच्या ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर त्यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला बाेलवून तरुणाला सिव्हिलमध्ये दाखल केले हाेते. मात्र उपचारादरम्यान त्याचा १ मार्च रोजी पहाटे मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तसेच मृतदेह सिव्हिलच्या शीतपेटीत ठेवण्यात आला होता. सात दिवसांनंतरही नातेवाईकांचा तपास लागला नाही. त्यामुळे गुरुवारी दुपारी ३ वाजता जिल्हा पेठ पोलिसांनी तरुणाचा नेरी नाका स्मशानभूमीत दफनविधी केला. याविषयी तपास अधिकारी संजय दोरकर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना माहिती कळवली हाेती. शुक्रवारी सकाळी वर्डी येथील भास्कर पाटील हे पोलिस पाटील यासाेबत मुलगा हरवल्याबाबत तक्रार देण्यासाठी अडावद पोलिस ठाण्यात गेले होते. या वेळी ठाणे अंमलदाराने त्यांना जिल्हा रूग्णालयात मृत झालेल्या अनोळखी युवकाचा फोटो दाखवला. तो भास्कर पाटील यांनी ओळखला.

 

दफन मृतदेह काढला बाहेर
शुक्रवारी दुपारी १२ वाजता संदीपचे नातेवाईक जिल्हापेठ पोलिस ठाण्यात व नंतर सिव्हिलमध्ये आले. पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तहसीलदार अमोल निकम यांना या प्रकाराबाबत पत्र दिले. त्यानंतर तहसीलदारांच्या प्रतिनिधी, पोलिस उपनिरीक्षक कविता भुजवळ, संजय दोरकर व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संदीपचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढून सायंकाळी ६.३० वाजता नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.


पत्नीशी शेवटचा बोलला
लालमातीजवळ (ता.चोपडा) २८ फेब्रुवारी रोजी संदीप हा जखमी अवस्थेत आढळून आला होता. तो ट्रकचालक होता. धूलिवंदनाच्या चार दिवसांपूर्वीच तो जळगाव येथे आलेला होता. धूलिवंदनाच्या अगोदरच्या दिवशी तो आपल्या गावी वर्डी येथे येणार होता. त्याबाबत त्याचे पत्नी कविता यांच्याशी बोलणेही झाले होते. ते त्याचे शेवटेच बोलणे झाले होते. त्याच्या पश्चात आईवडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...