आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचशेच्या नाेटेवरून दोन गटात हाणामारी, नगरसेवक पिरजादे यांच्यासह ७ जण जखमी, मेहरूणमध्ये तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- एका युवकाची ५०० रुपयांची नोट तूच उचलली, या गैरसमजातून बुधवारी रात्री १०.१५ वाजता मेहरूण परिसरात पिरजादे व मुलतानी या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात नगरसेवक इक्बाल पिरजादे यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत. या सर्वांना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात अाले अाहे. 


नगरसेवक पुत्र शकील इक्बाल पिरजादे यांनी सिव्हिलमध्ये पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांना दिलेल्या माहितीनुसार एका युवकाची ५०० रुपयांची नोट हरवली. ती एका अनोळखी मद्यपीने उचलून नेली. मात्र, याचा संशय गणेश सपकाळे (पूर्ण नाव माहित नाही) याच्यावर घेतला गेला. त्यामुळे काही तरुण गणेशला मारहाण करायला लागले. यात शकील पिरजादे याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. यातून पिरजादे यांनी मारहाण केल्याचा गैरसमज होऊन ही माहिती दुसऱ्या गटाला मिळाली. त्या गटातील काही युवकांनी लाकडी दांडा, काठ्यांनी नगरसेवक पिरजादे यांच्यासह सहा जणांवर हल्ला केला. त्यामुळे दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यात सात जण जखमी झाले असून जखमींना जिल्हा सामान्य रुग्नालयाद दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...