आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल येथे 2 कुटूंबात हाणामारी; 6 जण जखमी, 3 जणांची प्रकृती गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. - Divya Marathi
जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

यावल (जळगाव)- येथील खाटीक वाड्यात घरासमोर भंगार साहित्य का वादातून झालेल्या हाणामारीत एकाच कुटूंबातील 6 जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांवर यावल येथील रूग्णालयात प्रथमोपचार करण्यात आल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. यावल पोलिसांनी या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.

 


शहरातील बाबुजीपुरा भागातील खाटीक वाडा येथील रहिवासी बिस्मिल्ला नथ्थु खाटीक यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मंगळवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर शफी अलाऊद्यीन खाटीक यांनी काही भंगार साहित्य टाकले. तेव्हा फिर्यादी यांनी घरासमोर भंगार साहित्य का टाकले, असा जाब विचारला त्याचा राग आल्यावर शफी खाटीकसह कमरोद्याीन अलाऊद्यीन खाटीक, रफीक अलाऊद्यीन खाटीक, खालीद अलाऊद्यीन खाटीक, मो. अली कमरोद्यीन खाटीक, साबीर नबी खाटीक (सर्व रा. खाटीक वाडा, यावल) व इमरान अकबर खाटीक (रा. रावेर) या सात जणांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांवर लाठ्या काठ्या व लोखंडी रॉडने हल्ला चढवला. त्यात समोर जो येईल त्याला बेदम मारहाण केली. यात शेख नथ्थु शेख महेबुब खाटीक (वय 78) , सज्जाद नबाब खाटीक (वय 30) व शबानाबी दस्तगीर खाटीक (वय 30) यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्याने जबर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर जुनेद दस्तगीर खाटीक, अलताफ बिस्मिल्ला खाटीक व फिर्यादी बिस्मिल्ला खाटीक यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे. यातील पाच जणांवर यावल येथे ग्रामीण रूग्णालयात डॉ. रश्मी पाटील यांनी प्रथमोपचार केले व तात्काळ जळगाव येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

 


नागरिकांनी केली जखमींना मदत
घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना तात्काळ रूग्णालयात नेले व पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, हवालदार गोरख पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बिस्मिल्ला खाटीक यांच्या फिर्यादीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार रा. का. पाटील करीत आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...