आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप कार्यालयात मुलाखती सुरू असताना बाहेर हाणामारी; माजी नगरसेवक भिडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुकांच्या मुलाखतींना मंगळवारी सुरुवात झाली. वसंतस्मृती कार्यालयात मुलाखती सुरू असतानाच दुपारी २ वाजता याच परिसरात माजी नगरसेवक कैलास साेनवणे व पाच वर्षांपूर्वी खून झालेला प्रशांतचा भाऊ पंकज साेनवणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. काचेचे ग्लास, साेड्याच्या बाटल्यांचा यात वापर झाल्याने तणाव निर्माण झाला हाेता. पाच वर्षांपूर्वीच्या प्रशांत साेनवणे खून प्रकरणावरून ही चकमक उडाल्याचे प्रथमदर्शनी समाेर येत अाहे. 


जळगाव महापालिकेसाठी बुधवारपासून नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेणार अाहे. तत्पूर्वी भाजपतर्फे मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात अाल्या. इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन केल्याने भाजपच्या वसंतस्मृती कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरुप अाले हाेते. कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने माजी नगरसेवक कैलास साेनवणे, नगरसेवक अश्विन साेनवणे, अाबा बाविस्कर, दिलीप बाविस्कर, किशाेर चाैधरी, अशाेक लाडवंजारी, किरण बेंडाळे, संजय साळुंखे हे भाजप कार्यालयासमाेरील इमारतीच्या पायऱ्यांजवळ उभे हाेते. या वेळी अचानक गर्दीतून मृत प्रशांतचा भाऊ पंकज साेनवणे हा अाबा बाविस्कर यांच्याकडे अाला. त्याने या निवडणुकीत प्रभाग तीनमध्ये राहणाऱ्यांना जिवंत साेडणार नाही, असे म्हणत शिविगाळ केली.

 

कैलास साेनवणे यांनी शिवीगाळ का करताेय? अशी विचारणा करताच, पंकजने 'शड्डु' ठाेकला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. कैलास साेनवणे व पंकज साेनवणे यांच्यात याच विषयावरून 'दे दणादण' झाली. कैलास साेनवणेंसह त्यांचा सहकारी संजय साळुंखे यांनीही पंकजला मारहाण केली. दरम्यान, एकाच पक्षाचे शेकडाे कार्यकर्ते एकाच ठिकाणी गाेळा झाल्याने वाद नेमका काेणत्या कारणावरून झाला? हे काेणालाही सांगणे शक्य नसल्याने २० ते २५ मिनिटे वेगवेगळ्या अफवा सुरू हाेत्या. तसेच या भागात तासभर वाहतुकीची काेंडी झाली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन याठिकाणी पाेलिसांचे पथक दाखल झाले. त्यानंतर तणाव निवळला. 


सोनवणेंच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा

पंकज अंबादास सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास नारायण सोनवणे, संजय मुरलीधर साळुंखे व संजय चौधरी यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत सोनवणे खून खटल्यात कैलास सोनवणेंसह इतरांना जिल्हा न्यायालयाने निर्दाेष केले आहे. यात पंकज सोनवणेंच्या आई राधाबाई सोनवणे यांनी उच्च न्यायालयात अपिल केले असून त्याचे वाईट वाटल्यामुळे कैलास सोनवणेंसह तिघांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


पंकज साेनवणेवर गुन्हा
भाजप कार्यालयासमाेरील हाणामारीत जखमी झालेले माजी नगरसेवक किशाेर चाैधरी यांनी शहर पाेलिसात गुन्हा दाखल केला अाहे. त्यात उमेदवारी मुलाखतीच्या निमित्ताने भाजप कार्यालयासमाेरील काॅम्प्लेक्सच्या पायऱ्यांवर स्वत: चाैधरी, कैलास साेनवणे, धुडकू सपकाळे, सचिन माळी, दीपक बुनकर व कार्यकर्ते बसलेले हाेते. यावेळी पंकज अांबादास साेनवणे (रा. रिधुरवाडा) हा तेथे अाला. त्याने चाैधरींकडे पाहत पट ठाेकून 'या रे अाता काेण काेण माझ्या वाॅर्डात उभे राहताे. त्या एकेकाचे डाेके फाेडताे', असे म्हणत शिवीगाळ करत तु कसा वाॅर्डात उभा राहताे, असा दम दिला. या वेळी साेबतच्या सर्वांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले अाहे. तसेच जवळ असलेल्या अाईस्क्रीमच्या गाडीवरील काचेचा ग्लास फेकून मारला. त्यात हाताच्या पंजाला जखम झाली अाहे. शहर पाेलिस ठाण्यात किशाेर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 


काचेचे ग्लास फाेडले 
पंकज साेनणेकडून माजी नगरसेवक कैलास साेनवणे व संजय साळुंखे यांना जबर मारहाण सुरू असल्याचे लक्षात येताच इतरांनी वाद साेडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाद वाढत गेल्याने थेट काचेचे ग्लास व बाटल्यांचाही वापर करण्यात अाला. यात वाद साेडवण्याचा प्रयत्न करणारे माजी नगरसेवक किशाेर चाैधरींच्या हाताला जखम झाली. तर कैलास साेनवणेंच्या कानामागे तसेच संजय साळुंखे यांच्या ताेंडावर जखमा झाल्या. त्यांच्या शर्टवर रक्ताचे डाग असल्याने वीन शर्ट मागवून त्यांनी ताे घातला. 


प्रशांत साेनवणे खूनप्रकरणाची खुन्नस 
शनिपेठ परिसरातील प्रशांत साेनवणेचा पाच वर्षांपूर्वी खून झाला अाहे. यात माजी नगरसेवक कैलास साेनवणेंसह त्यांच्या भावंडाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल हाेऊन त्यांना अटक झाली हाेती. त्यानंतर ते निर्दाेष सुटले हाेते. तेव्हापासून कैलास साेनवणे व मृत प्रशांतच्या भावंडांत वाद अाहेत. याच कारणातून पंकज सानेवणे व माजी नगरसेवक कैलास साेनवणे यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जात अाहे. मात्र, या घटनेने मनपा निवडणुकीचा माहाेल अशांत झाला. 


दारूच्या नशेत पंकज साेनवणेने हु्ज्जत घातली. प्रभाग क्रमांक तीनमध्ये राहणाऱ्यांना जिवंत साेडणार नाही, असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. वाद साेडवण्याचा प्रयत्न करणारे किशाेर चाैधरी यांच्या हाताला जखम झाली. 
- कैलास साेनवणे, माजी नगरसेवक 

बातम्या आणखी आहेत...