आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

त्या कंटेनरचा क्रमांक फुटेजमधून शोधला; प्रौढाचा कार-कंटेनर अपघातात मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- वरणगाव येथे पत्नीला घेण्यासाठी निघालेल्या सावदा येथील ५२ वर्षीय प्रौढाचा कार-कंटेनर अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. संजय प्रल्हाद सराेदे असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर कंटेनचालकाने घटनास्थळावरून जळगावच्या दिशेने पळ काढला. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती आणि फेकरी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून बाजारपेठ पोलिसांनी कंटेनरचा क्रमांक मिळवला आहे. कंटेनर हावडा येथील असल्याची माहिती हाती आली आहे. 


सावदा येथील संजय प्रल्हाद सराेदे (वय ५२) हे त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी वरणगावला कारने (क्र.एम.एच.१९-सी.एफ. १४०९) जात होते. राष्ट्रीय महामार्गावरील हाॅटेल चाहेल ढाब्याच्या अलीकडे असलेल्या हर्षल नर्सरीजवळ सराेदे यांच्या हाेंडा अमेझ कारला समाेरून येणाऱ्या कंटेनरने चालकाच्या बाजूने धडक दिली. अपघातात सरोदे यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कंटेनरचालकाने घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला. मात्र, कंटेनरचे वर्णन प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. 


ट्रकच्या रंगावरून काढला माग 
हर्षल नर्सरीजवळ जेवण करताना गवई बाबा नावाच्या व्यक्तीने अपघाताचा आवाज ऐकला. त्यामुळे त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पिवळा रंग आणि पांढरी केबिन असलेला कंटेनर अपघातानंतर फरार झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...