आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावल (जळगाव)- आडगाव येथील सुमनबाई भगवान पाटील यांच्या राहत्या घरासह अन्य तिघांच्या गोठयास आग लागून 20 हजाराच्या रोकडसह लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराची आहे. ग्रामस्थांनी आग विझवितांना यात नितीन प्रहाद साबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. गुरूवारी पहाटे तहसीलदार कुंदन हिरे यांनी आडगाव तलाठी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
यावल-चोपडा रस्त्यावरील आडगाव येथील श्री मनुदेवी मंदिराच्या रस्त्यावरील सुमनाबाई भगवान पाटील यांच्या राहत्या घरास बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. त्याच बरोबर मोतीराम पाटील, सुकलाल पाटील, गोकुळ पाटील यांच्या गुरांच्या गोठयासही आग लागली आहे. आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आग लागल्याचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी आग विझविली आहे. आगीत सुमनाबाई यांच्या घरातील 20 हजाराच्या रोकडसह धान्य, संसारोपयोगी वस्तु तसेच घराचे व गोठयाचा मजला जळाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. गुरूवारी तहसीलदार हिरे यांनी तातडीने आडगाव तलाठी यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.