आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात ब्रिक्स फॅक्टरीला आग; माल जळाल्याने २५ लाखांवर नुकसान झाल्याचा अंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शिवपूर कन्हाळे शिवारातील एमआयडीसीमधील रिलायबल ब्रिकेट या अॅग्रीकल्चर वेस्टपासून ब्रिक्स (विटा)तयार करणाऱ्या फॅक्टरीला शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीत तब्बल २५ लाख रुपयांचा कच्चा व पक्का माल जळाल्याचा अंदाज आहे. 


एमआयडीसीतील प्लॉट नंबर ई ७५ मध्ये जळगाव येथील माणिक दीपक साखरे व दीपक गजानन साखरे यांची अॅग्रीकल्चर वेस्टपासून ब्रिक्स तयार करण्याची फॅक्टरी आहे. शुक्रवारी (दि. २७) रात्री आठ वाजेच्या दरम्यान या प्लँटमध्ये फटाक्यासारखा मोठा आवाज होऊन आग लागली. प्लांटसह कच्चा आणि पक्का माल ठेवलेल्या स्टोअरपर्यंत आग पोहोचल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले जात होते. 

बातम्या आणखी आहेत...