आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकारीसाठी अर्ध्या रात्री अभयारण्यात शिरले शिकारी, वन विभागाने सापळा रचून केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- वन्य प्राण्यांची शिकार करण्याचा उद्देशाने यावल अभायरण्याता घुसलेल्या पाच शिका-यांना वन विभागाच्या अधिका-यांनी वन्यप्रेमीच्या मदतीने सापळा रचून पकडले आहे. त्यांचे दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. वनविभागाकडून रात्रीच्यावेळी प्राणीगणना करत असताना ही प्रकार समोर आला.


यावल अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वनविभागाकडून प्राणी गणने करीता तब्बल 23 ठिकाणी मचानी लावण्यात आल्या होत्या व अनेक वनप्रेमींनी देखील या प्राणी गणनेकरीता वनात हजेरी लावली होती तर वनविभागा कडून या करीता विविध अधिकारी कर्मचारी देखील वनात तळ ठोकुन होते तेव्हा वनात असलेल्या यावल प्रादेशिक वनविभाग पूर्वचे वनक्षेत्रपाल व्ही. एम. पाटील यांना वनातील कक्ष क्रमांक ४५ मध्ये क्षेत्र तिड्या – मोहमांडली यात काही जण वनप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने मोर नदी व वाघुर भागात असल्याची माहिती मिळाली तेव्हा पाटील यांनी सोबत वनपाल ए. आर. धात्रक, जी. बी. डांेगरे, डी. डी. जाधव, डी. एस. सांगवीकर, एस. आर. तडवी, गस्ती पथकाचे एस. आर. पाटील यांना सोबत घेत सापळा लावून नदीपात्रात धडक दिली तेव्हा वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना पाहुन शिकारी करीता आलेल्यांनी पळ काढला त्यात चार जण पसार झाले मात्र, गेंदराम हादू बारेला रा. तिड्या ता. रावेर, गिलदार वेस्त्या बारेला व अनिल जामसिंग बारेला दोघं रा. अंधारमळी ता. रावेर यांना अटक करण्यात आली तुघांना रावेर न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची वनकाठडी सुनावण्यात आली. फरार चौघांपैकी बुधवारी वनविभागानेे गेलसिंग कान्या बारेला व दिनेश नरसिंग बारेला या दोघांना अंधारमळी ता. रावेर येथुन अटक करण्यात आली आहे. संशयीतांकडून शिकारीचे काही साहित्य देखील वनविभागाने ताब्यात घेतले आहे

बातम्या आणखी आहेत...