आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट ट्रेनसाठी मोदींनी दुप्पट पैसे मोजले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा अाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही निविदा न काढता जपानला १ लाख १० हजार कोटीच्या बुलेट ट्रेनची ऑर्डर दिली. ही ऑर्डर चीन, फ्रान्स आणि इतर देश केवळ ५० हजार कोटींमध्ये घेण्यास तयार होते; परंतु निम्म्या खर्चात शक्य असलेली ऑर्डर मोदींनी दुप्पटीने दिल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

 

गाेदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अायाेजित काँग्रेसच्या 'व्हिजन २०१९' या जिल्हा शिबिरात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी 'भारतासमोरील अार्थिक अाव्हाने' या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले. बुलेट ट्रेनसाठी भारतीय शास्त्रज्ञांना ५० हजार काेटी दिले असते तर हे काम हाेऊ शकले असते. या ट्रेनमध्ये केवळ ७६० लाेक प्रवास करू शकतील; परंतु देशात राेज २ काेटी ७० लाख लाेक प्रवास करीत असलेल्या भारतीय रेल्वेच्या दुरूस्तीसाठी १ लाख काेटी रूपये दिले असते तर अाज एकही अपघात हाेऊ शकला नसता. त्यामुळे या अाॅर्डरची न्यायालयीन व नाेटबंदीच्या निर्णयाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चाैकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

 

माेदींनी देश विकला : भाई जगताप
काँग्रेस सरकारने देशात ४९ टक्के एफडीअाय अाणला. त्यावेळी भाजपने विदेशी गुंतवणुकीला थेट विराेध केला; परंतु सत्ता अाल्यानंतर भाजपने देशात १०० टक्के विदेशी गुंतवणूक अाणली. विशेष म्हणजे संरक्षण क्षेत्रात विदेशी गुंतवणूक अाणली. माेदींनी थेट देशच विक्री काढला अाहे, असा आरोप अामदार भाई जगताप यांनी केला.

 

व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण, माजी मंत्री वसंत पुरके, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डाॅ.उल्हास पाटील, अामदार भाई जगताप, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, महानगर अध्यक्ष डाॅ.ए.जी भंगाळे, महानगर कार्याध्यक्ष डाॅ.राधेश्याम चाैधरी, डाॅ.जी. एन. पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चारूलता टाेकस, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, आबा दळवी, शाह आलम उपस्थित हाेते. डाॅ.हेमलता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पहिल्या सत्रात स्मिता शहापूरकर यांनी भारतीय लाेकशाही समाेरी अाव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात अभिजित सपकाळ यांनी साेशल मीडियावर प्रेझेन्टेशन सादर केले. माजी अामदार शिरीष चाैधरी, अॅड.ललिता पाटील, डी. जी. पाटील, अॅड.संदीप पाटील, जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांनी मार्गदर्शन केले.


नाेटबंदीचा निर्णय अमेरिकन कंपन्यांच्या दबावात
सर्वात माेठे अर्थतज्ज्ञ मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान असताना अार्थिक सल्लागार मंडळ नेमले हाेते; परंतु अर्थशास्त्राचा गंध नसलेल्या माेदींनी अार्थिक सल्लागार ठेवले नाही. त्यांनी नाेटबंदीचा निर्णय अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या दबावात घेतला. तर काँग्रेसच्या काळात ९.१ टक्क्यांवर गेलेला विकासदर माेदींच्या अवकृपेने ५.७ टक्क्यांपर्यंत खाली अाला, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

 

....तर सहकारमंत्र्यांवर असलेल कर्ज फेडेल
शेतकरी कर्जमाफीसाठी भाजप सरकारने ६६ रकान्यांचा अर्ज भरून घेतला अाहे. सहकारमंत्र्यांनी मदतीशिवाय स्वत: हा ६६ रकान्यांचा अर्ज भरून दिल्यास मी स्वत: सहकार मंत्र्यावरचे सर्व कर्ज फेडेल, असे अाव्हान पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

 

बातम्या आणखी आहेत...