आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे इतर पक्षातील अायातांच्या उमेदवारीमागे व्यावहारीक सूत्र; विजय मिळवणे हे भाजपचे ध्येय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कार्यकर्त्यांनी पक्षासाठी सदैव कार्यशील असले पाहिजे. प्रत्येक वेळी भावनिक हाेऊन अपेक्षा ठेवू नये. निवडणुका भावनिक नव्हे व्यावहारिक सूत्रांवर लढवल्या जातात. भाजपने यापूर्वी कार्यकर्त्यांनाच संधी दिली अाहे. परंतु, काही ठिकाणी इतर पक्षातून अालेल्यांना संधी दिली जात अाहे, त्यामागे व्यवहारिक सूत्र अाहे. विजय मिळवणे हे ध्येय ठेवून पक्षाने काही ठिकाणी असा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. 


भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना भावनिक साद घालणाऱ्या मंत्री बापट यांना पत्रकारांनी निवडणुकीत कार्यकर्त्यांएेवजी इतर पक्षातील लाेकांना संधी दिल्याबद्दल विचारले असता, त्यांनी अायातांच्या उमेदवारी मागील ही व्यावहारिकता पुढे केली. भाजप कार्यकर्त्यांना काेणतीही अपेक्षा नसते. प्रत्येक कार्यकर्ता मंत्री अाहे. मी मंत्री असूनही माझ्यातील कार्यकर्ता कायम अाहे. कार्यकर्ता हाच पक्षाचा प्राण असल्याचा प्रेरणादायी संवाद साधत मंत्री बापट यांनी भाजप कार्यालयात अापल्या भावना व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांशी संवाद संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अाधीच्या संवादाचा धागा पकडून पत्रकारांनी त्यांना अलीकडच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांपेक्षा इतर पक्षातील लाेकांना प्राधान्य दिले जात असल्याबद्दल विचारले असता, संतापलेल्या मंत्री बापट यांनी पक्ष अाणि कार्यकर्ता यांचा विषय भावनिक असल्याचे सांगितले. दरम्यान, अलीकडे विजयाचे राजकीय सूत्र लक्षात घेऊन भाजपने इतर पक्षातील चांगल्या लाेकांना उमेदवारी दिली, असे त्यांनी स्पष्ट केले. 


अामदार खडसेंना त्रास देणारा 'ताे' मंत्री मी नव्हे 
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांच्या अाडून अापल्याला एक मंत्री त्रास देत असल्याचे सांगितले हाेते. या मंत्र्याचे नाव त्यांनी जाहीर न केल्यामुळे गुरुवारी खडसेंना त्रास देणारा ताे मंत्री काेण? याबाबत मंत्री गिरीश बापट यांना विचारले असता, मंत्री बापट पत्रकारांवरच संतापले. हा प्रश्न तुम्ही मला का विचारला? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. त्यावर त्रास देणारे ते मंत्री तुम्ही तर नाही ना? असा उलट प्रश्न केल्यावर मंत्री बापट यांनी खडसेंना त्रास देणारा 'ताे' मंत्री मी नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, खडसेंचे सर्व ठिक हाेईल. ते पुन्हा मार्गदर्शन करतील, असेे सांगत त्यांनी बगल दिली. 

बातम्या आणखी आहेत...