आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्ह्यात दोघांचा शॉकने, दोघांचा बुडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी शुक्रवारी जाेरदार पाऊस झाला. पावसामुळे चाेपड्यातील रत्नावती नदीला पूर अाला. पाराेळ्यातील बाेरी धरणात तीन फूट पाणी वाढले हतनूर धरणातूनही विसर्ग सुरू झाला आहे. तसेच चार विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. त्यातील दाेघांचा मृत्यू शाॅक लागून तर दाेघांच्या पाण्यात बुडून झाला. 


अमळनेर तालुक्यातील वावडे शिवारात पंधरा वर्षीय प्रवीण भील याचा शेततळ्यात बुडून शुक्रवारी मृत्यू झाला. धरणगाव तालुक्यातील (वराड बु) येथील नारायण पाटील शेतकऱ्याचा व दाेन बैलांचा वीज तारेच्या धक्क्याने मृत्यू झाला. वादळी पावसामुळे तार तुटली होती. चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु्द्रुक येथील शेतात विद्युत खांबावर विजेचा प्रवाह उतरल्याने तांबाेळे येथील बापू सूर्यवंशी शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला. बाेदवड तालुक्यातील साळशिंगी येथील विद्या सोपान चौधरी ही १८ वर्षीय तरुणी गुरुवारी शेतातून घरी परत येताना नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली होती. शुक्रवारी तिचा मृतदेह सापडला. दरम्यान, नवापूर शहरासह परिसरात तासभर जोरदार पाऊस झाला. शहरातील डी.जे. अग्रवाल इंग्लिश मिडियम स्कुलच्या पाण्याच्या टाकीवर वीज पडली. सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. 

बातम्या आणखी आहेत...