आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकींची शर्यत; स्कॉर्पिओ कार तीन टपऱ्यांवर आदळली, मध्यरात्रीचा थरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- नाहाटा चौफुली ते बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या मार्गावर मध्यरात्री दोन चारचाकींची शर्यत लावण्याचा प्रयत्न चार युवकांना चांगलाच महागात पडला. बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात भरधाव स्कॉर्पिओ रस्त्यालगत असलेल्या तीन टपऱ्यांना धडकली. अपघातानंतर स्कॉर्पिओ रस्त्यावरच कलंडल्यामुळे गाडीतील चौघे जखमी झाले. 


शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी गाैरव लुल्ला, गाैरव मनवानी, निखिल रत्नानी व समित राणे यांनी मित्रांसह बुधवारी रात्री महामार्गावरील एका ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास चौघे स्कॉर्पिओने (क्र.एमएम.०५-सीएच.९००१) महामार्गावरूनच नाहाटा चौफुलीकडे आले. तर त्यांच्यासोबत असलेले मित्र स्विफ्ट डिझायर (क्रमांक माहित नाही) कारने त्या ठिकाणी जमले. त्यानंतर हा प्रकार घडला. 


अपघातस्थळी काचांचा खच 
अपघातात प्रभाकर जावळे यांच्या पानटपरीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच उल्हास जाधव यांचे चिकन सेंटर, रमेश काेठारी यांचे ढेप विक्रीचे दुकान व शरद देवरे यांच्या गजानन फर्नीचर दुकानाचेही नुकसान झाले. गुरूवारी सकाळपर्यंत अपघातग्रस्त वाहन जागेवरच पडून होते. सकाळी १० वाजेनंतर पाेलिसांनी अपघातग्रस्त स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. अपघातस्थळी ऑईल, काचांचा खच पडला होता. 


दोन्ही वाहनमालकांचा शोध 
शर्यत लावल्याच्या दृष्टीने पोलिस या प्रकरणाचा तपास करत अाहेत. जखमींना रात्रीच उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणातील दुसऱ्या वाहनाचा पोलिस शाेध घेत अाहेत. शर्यतीमधील दोन्ही वाहनांच्या मालकांचा पोलिस शोध घेत आहेत. लवकरच दोघांची नावे समोर येणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...