आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेच्या 'त्या' प्रतापी लिपिकाची अखेर हकालपट्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा परिषदेतील जुन्या इमारतीमध्ये असलेल्या कृषी विभागात स्वाक्षरी करून नवीन इमारतीमध्ये असलेल्या बांधकाम विभागात जुन्याच नियुक्तीच्या जागेवर कामकाज करणारा लिपिक पदभार साेडण्यास तयार नसल्याचे वृत्त 'दिव्य मराठी'ने गुरूवारी प्रसिद्ध केले हाेते. याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने त्या लिपिकाची तडकाफडकी हकालपट्टी केली अाहे. संबंधित लिपिकाच्या कार्यमुक्तीचे अादेश जिल्हा परिषद प्रशासनाने गुरूवारीच काढले. 


गेल्या फेब्रुवारी महिन्यात कृषी विभागात बदली हाेवूनही वरिष्ठ लिपिक सी. एस. पाटील हे बांधकाम विभागातील पदभार साेडण्यास तयार नव्हते. त्यांच्या जागेवर रूजू झालेल्या नवीन कर्मचाऱ्यास चार महिन्यांपासून काम नव्हते. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली हाेती. दरम्यान, लिपिक सी. एस. पाटील यांच्याबाबत पदाधिकारी, सदस्य यांच्या देखील तक्रारी हाेत्या. सुशिक्षीत बेरोजगारांनी त्यांच्याविराेधात प्रशासनाकडे लेखी तक्रार केली हाेती. या तक्रारींची दखल न घेता प्रशासनातील अधिकारी सी. एस. पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले हाेते. दरम्यान, तक्रारींचा पाऊस असूनही संबंधित लिपिकाची बदली हाेत नसल्याचे वृत्त 'दिव्य मराठी'ने प्रसिद्ध करताच प्रशासनाने २८ जून राेजी त्यांना कार्यमुक्त करण्याचे अादेश काढले. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डि. के. पवार यांनी सी. एस. पाटील यांना कार्यमुक्त करत असल्याचे लेखी अादेश काढले अाहेत. दरम्यान, सध्या पाल येथे प्रशिक्षणासाठी गेलेले सी. एस. पाटील हे २९ जून राेजी कृषी विभागात रूजू हाेणार अाहेत. त्यांच्या जागेवर बदली झालेले रवींद्र शिरसाठ यांना तातडीने पदभार घेवून अहवाल सादर करण्याचे अादेशात म्हटले अाहे. या कारवाईची चर्चा गुरुवारी दिवसभर जिल्हा परिषदेत दिसून अाली. 


पैसे घेतल्याची चाैकशी 
लिपिक सी. एस. पाटील हे सुशिक्षीत बेराेजगार अभियंत्यांच्या नाेंदणीसाठी, बीले काढण्यासाठी अाणि कामांच्या शिफारशींसाठी पैसे घेतात. या संदर्भात विचारले असता मला अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागत असल्याचे ते सांगत असल्याची तक्रार एका सुशिक्षीत बेराेजगार अभियंत्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली अाहे. या विषयी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांना विचारले असता, या प्रकरणाची चाैकशी करुन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...