आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावेरात १५०० ठेवीदारांची ३५ लाखांत फसवणूक; मध्य प्रदेशातील आरकेआर कंपनीने गंडवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर- मध्य प्रदेशातील 'राधे कृष्ण राधे अॅग्रो' (आरकेआर) सहकारी संस्थेने १२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून दीड हजार जणांना ३५ लाखांचा चुना लावला. सर्व गुंतवणूकदार रावेर तालुक्यातील अाहे. संबंधित कंपनीने दिलेले धनादेश न वटल्याने या प्रकरणाचा भंडाफोड झाला. 


रावेर येथील छोरिया मार्केटमध्ये कार्यालय थाटून बडवानी येथील   रमेशचंद्र मौलवा व त्यांचे साथीदार आरकेआर संस्थेचे कामकाज पाहत होते. त्यांनी तालुक्यातील दीड हजार लोकांना दोन वर्षे दररोज ५० रुपये भरा आणि दोन वर्षांनी ४० हजार ४०० असे आमिष देऊन गंडवले. जानेवारीनंतर कंपनीने पैसे स्वीकारणे बंद केले. मात्र, ठेवीदारांचा विश्वास टिकून राहावा यासाठी प्रकाशचंद्र मौलवा यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बडवानी शाखेचे ५ एप्रिल २०१८ या तारखेचे धनादेश दिले. मात्र, ही तारीख जवळ येताच ठेवीदारांना आम्ही रोखीने रक्कम देणार आहोत. 


सीएमडींना नाेटीस 
सेंधवा येथील सीएमडी रमेशचंद्र मौलवा, व्यवस्थापक भरत पाटील, गौरव गोस्वामी, रावेर शाखेचे व्यवस्थापक प्रकाश चव्हाण, एरिया मॅनेजर उत्तमराव चौधरी हे कंपनीचे कामकाज पाहत होते. त्यापैकी फसवणूकप्रकरणी ठेवीदारांनी सीएमडींना नोटीस देण्याचा मार्ग अवलंबला आहे. 

बातम्या आणखी आहेत...