आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाचे लग्न जमवून देण्यासाठी महिलेची 50 हजारांत फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शनिपेठ भागात राहणाऱ्या एका महिलेच्या मुलाचे लग्न जमवून देण्याचे आमिष देऊन चार भामट्यांनी ५० हजार रुपयांत फसवणूक केली आहे. याप्रकरणी महिलेने पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला आहे. 


कमल सुकदेव पाटील असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा नाशिक येथे खासगी कंपनीत नोकरीस आहे. त्याच्या लग्नासाठी मुलगी दाखवून देण्याचे आमिष देत विटनेर येथील राजू पाटील, भरत पाटील, कडूबा माळी व उल्हास पाटील या चौघांनी त्यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. मुलगी बघितली आहे, लग्नाचा बस्ता करायचा आहे, असे सांगून त्यांनी वेळोवेळी पैसे घेतले होते. विशेष म्हणजे त्यांनी कमल पाटील यांना मुलगी न दाखवताच लग्नाची तारीख ठरवली होती. परंतु दोन-तीन दिवस आधीच मुलीच्या नातेवाइकाचे निधन झाल्याची चाट मारून लग्न एक महिना पुढे ढकलले. महिना उलटल्यानंतर पाटील यांनी फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, कोणीच त्यांचे फोन घेतले नाहीत. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु भामट्यांना पैसे दिल्याचे पुरावे नसल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. अखेर ९ एप्रिल रोजी त्यांनी पोलिस अधीक्षक कराळे यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...