आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचऱ्याला आग; केमिकलयुक्त धुराचा लाेकांना श्वसनाचा त्रास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - एमअायडीसीतील 'के' सेक्टरमधील रस्त्याच्या बाजूला टाकण्यात अालेल्या कचऱ्याला काही अज्ञात लाेकांनी पेटवून दिले. या अागीमुळे परिसरातील असलेल्या कंपनीमधील कामगारांसह उद्याेजक व या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला. दरम्यान, कचऱ्याला लावण्यात अालेली अाग विझवण्यासाठी शनिवारी अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करुन ही अाग अाटाेक्यात अाणण्यात अाली. या अागीमुळे परिसरात केमिकलयुक्त धुराचे लाेट पसरले हाेते.

 

एमआयडीसीतील 'के' सेक्टरमधील खदान परिसरात रस्त्यालगत अनेक कंपनी मालक आपला टाकावू कचरा टाकत असतात. या कचऱ्याला वरच्यावर आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक कंपनी मालक तसेच येथे काम करणाऱ्या लोकांना येथे काम करणे नकोसे झाले आहे. येथे रोजच कुठे ना कुठे आग लागलेलीच असते. शनिवारी अनेक कंपन्यांना सुटी असल्याने येथील कचऱ्याला दोन ते तीन ठिकाणी आगी लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे आग अधिक पसरू नये व धुराचे लोट कमी व्हावा, यासाठी अग्निशमनच्या एका बंबाने ही आग विझवली. या आगीच्या केमिकलयुक्त धुरामुळे येथील लोकांना श्वसनाचे आजार, डोळ्यातून पाणी येणे, डोळे चुरचुरणे असे प्रकार घडले. या रस्त्यालगत अनेक चटई उद्योग, बारदान व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांना तसेच त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांना या केमिकलयुक्त धुराचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. या परिसरात खदान व मोकळी जागा असल्याने येथे टाकाऊ कचरा टाकण्यात येता. हा टाकावू कचरा खदान परिसरात लांब न टाकता रस्त्याच्या कडेलाच टाकून त्याला वरच्यावर आग लावण्यात येते. हवेमुळे आग व धूर परिसरात पसरताे. या धुरामुळे रस्त्यावरून जाणारे जवळचे वाहन देखील दिसत नाही. त्यामुळे अपघात घडण्याची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील व्यावसायिक, कामगारांनी केली आहे.

 

कायमस्वरुपी उपाय करावा
अनेकदा परिसरातील लोक वाहनाद्वारे येथे आपल्या कंपनीतील टाकावू कचरा रस्त्यालगत टाकत असतात. त्याचप्रमाणे या टाकलेल्या कचऱ्याला आगी लावतात. या रस्त्याच्या लगतच माझे बारदानचे युनिट आहे. येथील धुराच्या लोटमुळे मला व माझ्याकडील कामगारांना येथे काम करणे नकोसे होते. कचरा टाकणाऱ्यांना रोखले तर, ते अरेरावीची भाषा करतात. यावर कायमस्वरुपी काहीतरी उपाय करावा.
- मधुकर सावंत, व्यावसायिक

 

बातम्या आणखी आहेत...