आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेरच्या तरुणीला २३ लाखांचे पॅकेज; दिल्लीतील सी. के. बिर्ला कंपनीत 'मॅनेजमेंट ट्रेनी' म्हणून निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर- जामनेर सारख्या ग्रामीण भागात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या नूपुर नीळकंठ पाटील या २३ वर्षीय तरुणीस दिल्लीच्या कंपनीने २३ लाखांचे पॅकेज दिले अाहे. कोलकता येथील इन्डियन इन्स्टिट्यूट अाॅफ मॅनेजमेंटमधून (अायअायएम)मधून एमबीएची पदवी घेताच दिल्लीतील सी. के. बिर्ला कंपनीने तिची 'मॅनेजमेंट ट्रेनी' म्हणून निवड केली अाहे. वयाच्या २३व्या वर्षीच नूपुर विविध अभ्यासासाठी १४ देशांत जाऊन अाली अाहे. 


नूपुरने बारावीपर्यंतचे शिक्षण जामनेरात पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून बी.टेक-संगणकशास्त्र विषयाची पदवी घेतली. एमबीएसाठी तिची देशातील नामांकित संस्था आयआयएममध्ये निवड झाली. 


एमबीएच्या शेवटच्या वर्षात असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यूमधून तिची निवड केली. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन इतके माेठे पॅकेज मिळवणारी नूपुर अाता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आयडॉल ठरली आहे. नूपुरची अाई डाॅ. सुरेखा व वडील डाॅ. नीळकंठ हे दाेघे अायुर्वेदाचार्य अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...