आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाकडून अश्लील फोटो काढून मुलीवर अत्याचार, पोट दुखू लागल्यामुळे प्रकार उघडकीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलीचे अश्लील फोटो काढून बदनामी करण्याची धमकी देत शिक्षकानेच तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. पोलिसांनी शिक्षक तुषार माळीला अटक केली आहे. 

 

तुषार शांताराम माळी (वय २९, नशिराबाद) हा नशिराबादच्या एका शाळेत विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षक पदावर नोकरीस होता. सहा महिन्यांपूर्वी काही कारणास्तव त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. त्याशाळेत पीडित विद्यार्थिनी सीमा (नाव बदललेले)आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दरम्यान, शिक्षक माळीने घरीच खासगी क्लासेस सुरू केले. सीमा ही देखील त्याच्या क्लासमध्ये दाेन विषयांच्या शिकवणीला जात असे. 'तुला नापास करून टाकेल,' अशी धमकी तुषारने नोव्हेंबर २०१७मध्ये सीमाला दिली. तसेच याच धमकीच्या आधार त्याने घरातच सीमावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. एका विषयाच्या शिकवणीला ती एकटीच असल्यामुळे याच वेळी तुषार तिच्यावर अत्याचार करत होता. भीतीपोटी सीमाने ही बाब कुणालाही सांगितली नाही. त्यानंतर तुषारने तिचे अश्लील फोटो देखील काढले. हे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देखील तो वारंवार देत होता. सीमा प्रचंड दहशतीत आल्यामुळे तुषारने अत्याचार करणे सुरू ठेवले होते. यातच ती गर्भवती झाली. 

 

काही दिवसांपूर्वी तिचे पोट दुखू लागल्यामळे कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तपासणी केली असता ती १२ आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सीमाने घडलेला सर्व घटनाक्रम अाईला सांगितला. शिक्षक असलेल्या तुषारनेच हे कृत्य केल्याचे समोर आले. अखेर शुक्रवारी मध्यरात्री पीडित सीमा व तिच्या कुटुंबीयांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार तुषारवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आर. टी. धारबळे तपास करत आहेत. 


शिक्षकाचा मोबाइल जप्त, प्रयोगशाळेत पाठवणार 
तुषार याने स्वत:च्या मोबाइलमध्ये सीमाचे अश्लील फोटो काढले होते. दरम्यान, हे फोटो त्याने मोबाइलमधून नष्ट (डिलीट) केले आहेत. काही फोटो पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. तर उर्वरित फोटो तसेच मोबाइलची सखोल चौकशी करण्यासाठी कलिना येथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेत ताे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती धारबळे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. 

 

मुलीची व शिक्षकाची डीएनए चाचणी करणार 
तपासाचा भाग म्हणून पीडित मुलीसह गर्भ व तुषार यांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही तासांतच तुषार याला नशिराबाद येथील घरून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर पीडित सीमा ही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...